सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21; सारीचे आढळले दोन रुग्ण

The number of corona patients in Solapur is 21
The number of corona patients in Solapur is 21

सोलापूर: सोलापूर शहरातील बापुजीनगर, कुर्बान हुसेन नगर,  जगन्नाथ नगर, भद्रावती पेठ या भागात आज (सोमवारी) नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 15 वरून 21 झाली असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
नव्याने भर पडलेल्या सहा रुग्णांमध्ये तेलंगी पछा पेठ परिसरातील दोन रुग्णांचा समावेश आहे. बापुजीनगर, कुर्बान हुसेन नगर, हैदराबाद रोड, शेळगीतील आयोध्यानगर हा परिसर जिल्हा प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 778 जण सध्या आयसोलेशन वॉर्डात असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 569 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 548 जणांची रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 21 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. उर्वरित 19 जणांवर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. आज नव्याने भर पडलेल्या सहा रुग्णांमध्ये दोन रुग्ण ही सारी आजाराशी निगडित असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे. 


घराबाहेर पडू नका प्रशासनाला सहकार्य करा
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून संपूर्ण संचारबंदीचा आदेश लागू होणार आहे. या कालावधीत सोलापूर शहराच्या सर्व हद्दी बंद केल्या जाणार असून शहरात संपूर्ण संचारबंदी अंमलबजावणी सुरू होणार आहे. या कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सुविधा असल्यास त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्ष ०२१७ २७३१०१२ अथवा १८००२३३५०४४ या जिल्हा प्रशासनाच्या  हेल्पलाइनवर संपर्क साधावा. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com