
ठळक बाबी...
सोलापूर : शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 442 संशयितांमध्ये आढळले 28 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे 9 आणि 21 डिसेंबर रोजी उपचारासाठी दाखल झालेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात निलम नगर परिसरातील श्रमजिवी नगरातील 54 वर्षीय पुरुषाचा आणि न्यू पाच्छा पेठेतील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
ठळक बाबी...
शहरात आज सहस्त्रार्जुन नगर, राघवेंद्र नगर, स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), पारीजातक अपार्टमेंट (जुळे सोलापूर), नम्रता सोसायटी, विकास नगर, नेताजी सुभाष नगर (विजयपूर रोड), बालाजी नगर (कुमठा नाका), कल्याण नगर (मजरेवाडी), रेवणसिध्द नगर, ओम नम:शिवाय नगर, रामलिंग सोसायटी, श्रीदेवी नगर (एमआयडीसी रोड), मंत्री चंडक कॉम्प्लेक्स, मोदीखाना, हेरिटेज अपार्टमेंट, आसरा सोसायटी, लक्ष्मी पेठ (दमाणी नगर), रामलाल नगर (होटगी रोड) आणि गुलमोहर कॉम्प्लेक्स (मोदी) येथे नवे रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील 113 संशयित होम क्वारंटाईनमध्ये असून 23 संशयित इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 19 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.