कोरोना बाधितांच्या संख्येने ओलांडला 38 हजाराचा टप्पा 

प्रमोद बोडके
Saturday, 17 October 2020

रुग्णालयात सध्या 4 हजार 493 जणांवर वर उपचार सुरू आहेत. महापालिका हद्दीत 672 एवढेच ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण आता राहिले आहेत. ग्रामीण भागातील ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 821 एवढी राहिली आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील 1 हजार 325 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 813 तर महापालिका हद्दीतील 512 जणांचा समावेश आहे. 

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आज 38 हजार 27 झाली आहे. महापालिका हद्दीत आज 24 नवीन रुग्ण आढळल्याने येथील एकूण रुग्ण संख्या 9 हजार 224 झाली आहे. ग्रामीण भागात आज नव्या 101 रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागातील बाधितांची एकूण संख्या आता 28 हजार 803 झाली आहे. 

आजच्या अहवालानुसार दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे बळी गेलेले हे सर्वजण 10 जण ग्रामीण भागातील आहेत. आज एकाच दिवशी 320 कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 240 व महापालिका हद्दीतील 80 जणांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 32 हजार 209 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 24 हजार 169 व महापालिका हद्दीतील 8 हजार 40 जणांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 47 अहवाल प्रलंबित आहेत. हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of Corona victims crossed the 38,000 mark