
38 हजार जण कोरोना मुक्त
सोलापूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या 42 हजार 4 कोरोना बाधितांपैकी 38 हजार 338 जण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 8 हजार 808 तर ग्रामीण भागातील 29 हजार 530 जणांचा समावेश आहे.
सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीत 9 हजार 795 तर ग्रामीण भागात 32 हजार 209 कोरोना बाधित रुग्ण आत्तापर्यंत आढळल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 42 हजार 4 एवढी झाली आहे.
कोरोनामुळे आत्तापर्यंत ग्रामीण भागातील 958 तर महापालिका हद्दीतील 543 जणांचा अशा एकूण 1 हजार 501 जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या अहवालानुसार 144 नव्या कोरोना बाधितांची भर जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 125 तर महापालिका हद्दीतील 19 जणांचा समावेश आहे.
आज एकाच दिवशी 213 कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 12 तर ग्रामीण भागातील 201 जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालात सोलापूर महापालिका हद्दीतील एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद नाही. ग्रामीण भागातील सात व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद या अहवालात घेण्यात आहे.
कोरोना चाचणीचे अद्यापही 48 अहवाल प्रलंबित असून हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत. रुग्णालयात सध्या 2 हजार 165 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 721 तर महापालिका हद्दीतील 444 जणांचा समावेश आहे.