सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या एक हजार 188  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

आज रविवारी 191 अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 163 अहवाल निगेटिव्ह आले, तर 28 अहवाल बाधित आले.

सोलापूर ः सोलापूर महापालिका क्षेत्रात आज सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर नवीन 28 रुग्ण आढळले. आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या एक हजार 188 वर पोचली आहे. 
शहरातील निराळेवस्ती, मुकुंदनगर, सिद्धेश्‍वर पेठ, हनुमाननगर, विजयपूर रस्ता, मड्डीवस्ती, दत्तनगर, बुधवार पेठ, न्यू बुधवार पेठ, रंगभवन चौक, प्रतापनगर विजयपूर रस्ता, मंत्रीचंडकनगर, भवानी पेठ, पाथरुट चौक, नर्सिंग क्वार्टर शासकीय रुग्णालय, बुधवार पेठ, अवंतीनगर, नीलमनगर, मसिंहा चौक, मरिआई चौक, श्रीकृष्ण वसाहत, मॉडर्न हायस्कूल परिसरात हे रुग्ण आढळले आहेत. आज रविवारी 191 अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 163 अहवाल निगेटिव्ह आले, तर 28 अहवाल बाधित आले. आतापर्यंत आठजण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले. सहा जणांचा मृत्यू झाला असून, त्याते शासकीय रुग्णालय व अश्‍विनी सहकारी रुग्णालयात प्रत्येकी एक, तर मार्कंडेय रुग्णालयातील चार रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण सात हजार 680 रुग्णांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सात हजार 512 जणांचा अहवाल प्राप्त झाला. पैकी सहा हजार 224 अहवाल निगेटिव्ह तर, एक हजार 188 जणांचा अहवाल बाधित आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona victims in Solapur is one thousand 188