कोरोनामुळे सोलापूर शहर-जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर 

संतोष सिरसट 
Sunday, 13 September 2020

कोरोनाविषयी सोलापूरची फॅक्‍ट फाइल... 

 • सध्या होम क्कारंटाइनमध्ये दाखल : 8686 
 • इंस्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये दाखल : 1871 
 • रुग्णालयात उपचार घेत असलेले : 6728 
 • आत्तापर्यंत निगेटिव्ह आलेले रिपोर्ट : 183829 
 • अद्याप रिपोर्ट येणे बाकी : 137 
 • बाधित : 22839 
 • मृत्यू : 997 
 • स्वगृही परतले : 17174 

सोलापूर ः शहर-जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. दररोज नवनवे उच्चांक करत बाधितांची संख्या वाढतच चाचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. आजअखेर शहर-जिल्ह्यात 997 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढत असताना बाधितांची संख्याही वाढू लागली आहे. त्याचबरोबर काही प्रमाणात लोक बरे होऊन घरेही जाऊ लागले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र वाढत असलेल्या बाधितांच्या संख्येवरुन स्पष्ट होते. काही तालुक्‍यांनी कोरोनाला अटकाव करण्यासाठी जनता कर्फ्यू चा मार्ग अवलंबिला आहे. मंगळवेढा, सांगोला या तालुक्‍यांमध्ये तसा प्रयोग केला जात आहे. याशिवाय माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, यशवंतनगर, संग्रामनगर याठिकाणीही जनता कर्फ्यूची अंमलबजावणी सुरु केली आहे. अशाप्रकारचे प्रयोग लोकांमधऊन होत असल्याने त्यांना कोरोनाच्या भयानकतेची जाणिव होऊ लागल्याचे दिसून येते. कोरोनामुळे अद्यापही सहा हजार 728 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत केलेल्या चाचण्यांमधून शहर-जिल्ह्यातील एक लाख 83 हजार 829 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

 

कोरोनाविषयी सोलापूरची फॅक्‍ट फाइल... 

 • सध्या होम क्कारंटाइनमध्ये दाखल : 8686 
 • इंस्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये दाखल : 1871 
 • रुग्णालयात उपचार घेत असलेले : 6728 
 • आत्तापर्यंत निगेटिव्ह आलेले रिपोर्ट : 183829 
 • अद्याप रिपोर्ट येणे बाकी : 137 
 • बाधित : 22839 
 • मृत्यू : 997 
 • स्वगृही परतले : 17174 
 • संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of deaths due to corona in Solapur city district is on the threshold of thousands