बापरे! बार्शी तालुक्‍यात रुग्णसंख्या 3 हजार पार; दोन दिवसांत 236 कोरोनाबाधित, 5 जणांचा मृत्यू 

Corona
Corona

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यातील बुधवार व गुरुवार अशा दोन दिवसांच्या एक हजार 603 प्राप्त तपासणी अहवालामध्ये 236 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. बाधितांची संख्या 3 हजार 163 झाली आहे तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिली. 

दोन दिवसांत शहरातील 1 हजार 438 अहवालामध्ये 174 तर ग्रामीणमध्ये 165 अहवालात 62 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, शहरात 1 हजार 949 तर ग्रामीणमध्ये 1 हजार 214 असे एकूण 3 हजार 163 जण कोरोनाबाधित झाले आहेत. शहरातील आतापर्यंत 60 तर ग्रामीणमधील 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

मार्केट यार्ड, सुभाषनगर प्रत्येकी 4, अलिपूर रोड 11, भीमनगर 8, जावळी प्लॉट, वाणी प्लॉट, भवानी पेठ प्रत्येकी 3, ढगे मळा, सोलापूर रोड, आदर्शनगर, परंडा रोड, बार्शी गावठाण येथे प्रत्येकी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यशवंतनगर, सावळे चाळ, गाडेगाव रोड, भिसे प्लॉट, फुले प्लॉट, नागणे प्लॉट, ऐनापूर मारुती रोड, लोखंड गल्ली, मोमीनपुरा, मंगळवार पेठ, राऊळ गल्ली, अध्यापक विद्यालय, म्हाडा कॉलनी, क्रांतिसिंह नगर, चाटे गल्ली, कासारवाडी रोड, विठ्ठलनगर, नाईकवाडी प्लॉट, राऊत चाळ येथे प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित आढळला आहे. 

ग्रामीण भागातील वैराग 6, खांडवी, बावी (आ) प्रत्येकी 2, महागाव 6, पानगाव, पिंपळगाव, भोयरे, तांदूळवाडी, शेळगाव, मांडेगाव, उपळे दुमाला, नारी, हिंगणी, मानेगाव, लाडोळे येथे प्रत्येकी एकजण कोरोनाबाधित आढळला आहे. 

आतापर्यंत 2 हजार 202 जण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये शहरातील 1 हजार 252 तर ग्रामीण भागातील 950 जण आहेत. 27 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती दगडे-पाटील यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com