टेस्ट वाढल्यानंतर रुग्णसंख्या वाढली ! शहरातील 39 पुरुष अन्‌ 17 महिला पॉझिटिव्ह; 41 ठिकाणी सापडले रुग्ण

1Corona_93_0.jpg
1Corona_93_0.jpg
Updated on

सोलापूर : शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोना संशयितांची टेस्टिंग वाढविल्यानंतर आज शहरात 56 रुग्ण आढळले असून 890 जणांची टेस्ट करण्यात आली. संशयितांची रॅपिड ऍन्टीजेन व आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. शहरातील कोरोनाला आवर घालण्यासाठी संशयितांचे टेस्टिंग वाढविण्यात येणार आहे. कोरोना वाढू नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क वापरावे आणि हाताची स्वच्छता राखावी असे आवाहन केले जात आहे.

ठळक बाबी... 

  • आज शहरातील 890 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • शहरातील 41 ठिकाणी आढळले 56 रुग्ण 
  • आतापर्यंत शहरातील एक लाख 72 हजार 153 संशयितांची झाली टेस्ट 
  • शहरातील 84 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये; 13 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईन 
  • आतापर्यंत 653 जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू; शहरात 376 ऍक्‍टिव्ह रुग्ण 

शहरात आज दमाणी नगर, सम्राट अशोक सोसायटी (विजयपूर रोड), जुनी मिल कंपाउंड (मुरारजी पेठ), मंगळवार पेठ, गुरुनाथ नगर (कुमठा नाका), भवानी पेठ, माशाळ वस्ती, न्यू पाच्छा पेठ, निर्मिती विहार, शांभवी रेसिडेन्सी (जुळे सोलापूर), मंगळवार पेठ (शिवगंगा मंदिराजवळ), आरटीओ कार्यालयाजवळ (विजयपूर रोड), मंत्री चंडक आंगण, गांधी नगर (रविवार पेठ), वीरशैव नगर, झुंजे कॉम्प्लेक्‍स (दक्षिण कसबा), समर्थ सोसायटी, कृष्णा पार्क (विजयपूर रोड), जोडभावी पेठ, रामराज्य नगर (शेळगी), बलिदान चौक (भवानी पेठ), दक्षिण कसबा, नरेंद्र नगर (सैफूल), लतादेवी नगर (कुमठा नाका), अंलकापुरी नगर (दमाणी नगर), आसरा सोसायटी, होटगी नाका (सिव्हिल लाईन), दक्षिण कसबा (जुना विठ्ठल मंदिराजवळ), ककय्या नगर (शेळगी), मनपा कॉलनी (दक्षिण सदर बझार), दमाणी नगर, सिध्देश्‍वर पेठ, समर्थ चौक (बुधवार पेठ), जुनी मिल कंपाउंड, कृष्णा रेसिडेन्सी (दत्त चौक), आर्यनंदी नगर (वसंत विहार), पाटील नगर, चैतन्य नगर (विजयपूर रोड), वालचंद कॉलेजमागे आणि बसवेश्‍वर नगर (अंत्रोळीकर नगर) येथे नवे रुग्ण सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com