संशयितांच्या टेस्टिंगची संख्या वाढणार 

corona vaccine.jpg
corona vaccine.jpg

सोलापूर : कोरोनाचा वाढलेला जोर कमी करुन रुग्णसंख्या आटोक्‍यात यावी, यादृष्टीने महापालिका, जिल्हा परिषद, महसूल आणि पोलिस प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार संशयितांच्या टेस्टिंगवर भर दिले जाणार असून दररोज शहर-जिल्ह्यातील तीन हजार जणांची टेस्ट केली जाणार आहे. त्यात 38 टक्‍क्‍यांपर्यंत आरटीपीसीआर, तर 52 टक्‍के रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट असणार आहेत. पुन्हा कडक लॉकडाउन होऊ नये, म्हणून प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही सुरु केली आहे. 
शहर-जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी सुरु झाली असून 7 मार्चपर्यंत संचारबंदी राहणार आहे. रात्री 11 ते पहाटे पाच या वेळेत अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य कोणीही घराबाहेर पडल्यास, त्याच्यावर कारवाई केली जात आहे. शहरात दोनच टेस्टिंग लॅब असून अश्‍विनी ग्रामीण रुग्णालयात 200, तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात 1 हजार200 संशयितांची टेस्ट केली जाते. त्यामुळे टेस्टिंग लॅबची जेवढी क्षमता आहे, तेवढ्यांची आरटीपीसीआर, तर उर्वरित संशयितांची रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट केली जात आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी आता मास्क न घालणाऱ्यांसह विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जेणेकरुन बेशिस्तीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, हा उद्देश आहे. पूर्ण लॉकडाउन पुन्हा झाल्यास अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नियमांचे पालन करणे हाच ठोण उपाय ठरेल, असा विश्‍वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे. 

कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश
रात्रीच्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत. आता त्यासाठी चारशे होमगार्ड तैनात केले जातील. एकूण नऊ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येत असून बेशिस्त नागरिकांवर त्याठिकाणी कठोर कारवाई केली जात आहे. 
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्‍त 

टेस्ट करुन घ्यावी.
कोरोनाचा प्रसार वाढू नये, म्हणून संशयितांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन टेस्ट करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांच्या माध्यमातून कुटुंबातील अथवा समाजातील इतरांना कोरोनाची बाधा होणार नाही. शहरातील टेस्टिंग आता दररोज एक हजारांपर्यंत करण्यात येत आहे. 
- डॉ. बिरुदेव दुधभाते, आरोग्याधिकारी, महापालिका 

 लॉकडाउन करण्याची वेळ येणार नाही. 
शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन सर्वांनी काटेकोरपणे केल्यास निश्‍चितपणे कोरोना वाढणार नाही. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावेत, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हे साधे नियम पाळल्यास पुन्हा कडक लॉकडाउन करण्याची वेळ येणार नाही. 
- डॉ. शितलकुमार जाधव, आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com