सोलापूरच्या ग्रामीण भागातील बाधितांची संख्या तीनशेच्या खाली 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

तालुकानिहाय बाधितांची संख्या कंसात मृत्यू 
अक्कलकोट- 1022 (57), बार्शी- 4534 (147), करमाळा- 1866 (37), माढा- 2463 (78), माळशिरस- 4059 (77), मंगळवेढा- 1143 (23), मोहोळ- 1042 (49), उत्तर सोलापूर- 685 (29), पंढरपूर-4782 (115), सांगोला- 1824 (22), दक्षिण सोलापूर- 1252 (34), एकूण- 24672 (669). 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधितांची संख्या तीनशेच्या खाली आली आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सातत्याने 10 ते 15 च्या दरम्यान असणारी मृत्यींची संख्याही आज केवळ तीन इतकी आहे. त्यामुळे कोरोनाबाधित व कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही कमी झाल्यामुळे ग्रामीण भागाला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकूण दोन हजार 143 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 845 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 298 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर 297 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आपापल्या घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 24 हजार 672 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 669 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे सहा हजार 395 जण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत तर कोरोना बरा झाल्याने 17 हजार 608 जण आपल्या घरी गेले आहेत. आज मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील 65 वर्षाची महिला, डाळे गल्ली पंढरपूर येथील 20 वर्षाचे पुरुष तर चिंचगाव (ता. माढा) येथील 66 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of victims in the rural areas of Solapur is below three hundred