बार्शीत रस्ता ओलांडणे धोकादायक.. का

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

बार्शी  शहरातील बस स्थानक चौकातच पोलिस ठाण्यासमोरून पादचारी रस्ता ओलांडत असताना एसटी बसने समोरून धडक दिल्याने डोके, नाकातून रक्तस्त्राव होऊन उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. बार्शी शहर पोलिसात बसचालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

बार्शी (जि. सोलापूर) ः शहरातील बस स्थानक चौकातच पोलिस ठाण्यासमोरून पादचारी रस्ता ओलांडत असताना एसटी बसने समोरून धडक दिल्याने डोके, नाकातून रक्तस्त्राव होऊन उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. बार्शी शहर पोलिसात बसचालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 
परमेश्‍वर ऊर्फ प्रमोद बबन बोकेफोडे (वय 29, रा. झाडबुके मैदान, बार्शी) असे मृत पादचाऱ्याचे नाव आहे. उमेश जनार्दन चव्हाण (रा. पांगरी, ता. बार्शी ) याच्याविरुद्ध संतोष बोकेफोडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली. 
बसस्थानकातून बार्शी - माढा बस (एमएच 20 डी 8168) चौकातून जाताना भाजीविक्रेता परमेश्‍वर बोकेफोडे रस्ता ओलांडून पलिकडे निघाले होते. त्यांना बसने समोरून जोराची धडक दिली. ते सिमेंट रस्त्यावर पडल्याने डोक्‍याला जबर मार लागला. रक्तबंबाळ होऊन त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. पोलिसांनी, नागरिकांनी त्वरित खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मागील चार दिवसांपासून बोकेफोडे आजारी होते. पत्नी, वडील यांच्यासमवेत उस्मानाबाद येथे दोन दिवस शिबिरात उपचार करून घरी निघाले असताना ही दुर्घटना घडली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. 
स्वतःच्या ताब्यातील बस बेजबाबदारपणे, रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज न घेता वेगात चालवून झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बस चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offense against a bus driver