आम्ही लस घेतली तुम्ही पण घ्या ! जिल्ह्यातील 63 हजार ज्येष्ठ नागरिकांसह दीड लाखजणांनी घेतली लस

1vaccination_15.jpg
1vaccination_15.jpg

सोलापूर : शहरातील 47 हजार 795 जणांनी तर ग्रामीणमधील एक लाख तीन हजार 725 जणांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरीकडे 27 हजार 83 जणांनी लशीचा दुसरा डोस घेतला आहे. दरम्यान, शहर-जिल्ह्यातील सुमारे 147 केंद्रांवर लसीकरण सुरु असून सध्या स्टोअरमध्ये एकही डोस शिल्लक नाही. आता दोन दिवस पुरेल एवढीच लस शिल्लक असून आणखी साडेसहा लाख डोसची मागणी करण्यात आली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर अनेकांनी मोबाईलवर स्टेटस अथवा मेसेज पाठवून आम्ही लस घेतली, तुम्हीपण घ्यावी, असे अवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. 

एकाच दिवशी नऊ हजारजणांनी घेतली लस
पहिला डोस घेणाऱ्यांबरोबरच दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या लसीकरण केंद्रांवर वाढू लागली आहे. आज (शनिवारी) एकाच दिवशी शहरातील दोन हजार 317 तर ग्रामीण भागातील सहा हजार 331 जणांनी लस टोचून घेतली. दुसरीकडे 517 जणांनी लसीचा दुसरा डोस टोचून घेतला आहे. एकाच दिवशी नऊ हजार 165 जणांनी लस टोचून घेतल्याचे पहिल्यांदाच झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारपर्यंत (ता. 13) लशीचे किमान 50 हजार ते एक लाख डोस येणे अपेक्षित असल्याचेही डॉ. पिंपळे यांनी यावेळी सांगितले. 

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाचा चौथा टप्पा सुरु झाला असून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांवरही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर, नर्स त्यानंतर फ्रंटलाईनवरील वर्कर्स आणि तिसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वयोगटातील को-मॉर्बिड रुग्ण आणि 60 वर्षांवरील सर्वच ज्येष्ठांना लस टोचण्याचे काम हाती घेण्यात आले. आता 45 वर्षांवरील सर्वांनाच लस टोचली जात आहे. आतापर्यंतच्या सर्वच टप्प्यात शहर-जिल्ह्यातील दोन लाख 76 हजार 600 जणांना लस टोचली जाणार आहे. त्यापैकी एक लाख 51 हजार 520 जणांनी लस टोचून घेतली असून आता लसीकरणासाठी लोकांची गर्दी वाढू लागली आहे. आतापर्यंत 34 हजार 810 हेल्थ वर्कर्स यांनी तर फ्रंटलाईनवरील 27 हजार 19 वर्कर्सनी लस टोचून घेतली आहे. तर 63 हजार 307 ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घेतल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com