सोलापुरात भरधाव टिप्परच्या धडकेने एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

सोलापूर : भरधाव टिप्परच्या धडकेने केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणाऱ्या दुचाकीस्वार कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास होटगी रोडवरील गैबीपीर दर्गाह परिसरात घडली.

आय. जे. कांबळे (रा. पंकज सोसायटी, अंत्रोळीकर नगर परिसर, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कांबळे हे केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या जीएसटी कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर कांबळे हे याच कार्यालयात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर टपाल टपाल वाटपाचे काम करत होते. मंगळवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास होटगी रोडवरुन घराच्या दिशेने जाताना भरधाव टिपरने कांबळे यांच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेत जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. कांबळे यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed Tipper and bike accident in Solapur