रेशनमधून चार महिन्यात वाटप झाले "इतके' लाख मेट्रिक टन धान्य

Ration
Ration
Updated on

सोलापूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चपासून सुरू झाला. कोरोनाला रोखण्यासाठी सुरवातीला जनतेचा कर्फ्यू आणि त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाला. या कालावधीत अनेकांची रोजीरोटी ठप्प झाली. केंद्र व राज्य सरकारने एप्रिल ते जुलै यादरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात एक लाख सात हजार 172 मेट्रिक टन धान्य सवलतीच्या दरात व मोफत दिले आहे. 

लॉकडाउनमध्ये रेशनच्या धान्याचा तात्पुरता आधार अनेकांना मिळाला आहे. एप्रिलमध्ये अंत्योदयमधून एक हजार 978, प्राधान्य कुटुंब योजनेतून 10 हजार 172 टन व प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून 11 हजार 515 टन असे एकूण 23 हजार 666 टन धान्य वाटप करण्यात आले. मेमध्ये अंत्योदयमधून एक हजार 983, प्राधान्य कुटुंबमधून 10 हजार 239, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून 11 हजार 648 टन धान्य वाटप केले आहे. याच महिन्यात 318 टन डाळ, एपीएल केशरी कार्डधारकांना पाच हजार 601 टन धान्य वाटप करण्यात आले आहे. 

जूनमध्ये अंत्योदयमधून एक हजार 954, प्राधान्य कुटुंबमधून 10 हजार 130, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून सहा हजार 772 टन धान्य वाटप केले आहे. जूनमध्ये 406 टन डाळ व एपीएल केशरी कार्डधारकांना चार हजार 269 टन धान्य वाटप केले आहे. जुलैमध्ये अंत्योदय योजनेतून 1989, प्राधान्य कुटुंब योजनेतून 10 हजार 322, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून 17 हजार 843 टन धान्य वाटप करण्यात आले आहे. जुलैमध्ये 16 टन डाळीचेही वाटप झाले आहे. 

जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील म्हणाले, लॉकडाउन कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ज्या ज्या शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले आहे, त्यांना वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा विभाग व अन्नधान्य वितरण कार्यालयाची यंत्रणा तत्पर राहिली आहे. येत्या कालावधीसाठी शासनाकडून जसजसे धान्य उपलब्ध होईल तसे ते धान्य पात्र लाभार्थींना दिले जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com