एकीकडे लगीनसराई दुसरीकडे लॉकडाऊन  (video)

fb.jpg
fb.jpg

सोलापूर : आमचा पिढ्यान्‌ पिढ्या बांबूपासून सूप, टोपली, दुरडी तयार करून विकायचा व्यवसाय हाय. त्यात लगीनसराई हाय म्हणून वेगवेगळ्या वस्तू तयार केलो हाय. आता कुठं चार पैकं मिळवायचं दिस हायती म्हणलं तर बाजारपेठच बंद केलीय. खेडोपाडीही बाजारात जाता येत नाही. अशा दिवसात आम्ही काय करायचं? तयार साहित्य कुठं ठेवायचं... धूळखात आहे ते. घरात लहान मुलं-बाळं हायती, त्यांना खायला काय घालायचं, असे एक ना अनेक प्रश्‍न बुरूड समाजातील बांबूचा व्यवसाय करणाऱ्यांपुढे निर्माण झाले आहेत. कोरोनामुळे या समाजाची तुटपुंज्या रकमेवर जगण्याची धडपड सुरू आहे. 
बुरूड समाज हा अनेक वर्षांपासून बांबूपासून सूप, टोपली, दुरडी, परडी, परसराम आदी वस्तू तयार करून कलाकुसरीचे काम करतो. या कलाकुसरीत कारागिरांच्या कौशल्याची झलक पाहायला मिळते. पण आज हा व्यवसाय शेवटच्या घटका मोजतोय. मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी असल्यामुळे पुढील पिढी हा व्यवसाय सुरू ठेवेल की नाही, हे काही सांगता येत नाही. या समाजातील नागरिकांचा ओढा शिक्षण घेण्यापेक्षा व्यवसायाकडे जास्त आहे. पारंपरिक व्यवसाय करणारा बुरूड समाज अनेक समस्यांना तोंड देत आहे. या सर्वांचे हातावर पोट आहे. सध्या कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकुळामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. त्यात केंद्र आणि राज्यपातळीवर मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. त्यात लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणेही अवघड होऊन बसले आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. लग्नसराई तोंडावर आल्यामुळे एक महिन्यापासून त्यांनी बांबू आणून वस्तू तयार करण्यास सुरवातही केली होती. आता वस्तू तयार आहेत तर लग्नसराई बंद असल्यामुळे तयार केलेल्या वस्तू धूळखात पडून आहेत. बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंना आजच्या काळात पूर्वीसारखी मागणी नाही. या व्यवसायात मेहनत खूप आहे, मात्र आवक कमी आहे. प्लास्टिकच्या आक्रमणाने अनेक पारंपरिक व्यवसायावर संकट ओढावले आहे. बांबूपासून तयार मालांची विक्री होत नसल्यामुळे घरातील लहान मुलांना काय खाऊ घालणार? यामुळे रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला असून सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

50चा बांबू 150ला 
लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडता येत नाही. आठवडे बाजार बंद आहेत. त्यात लगीनसराईही आली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे व्यवसाय अडचणीत आला आहे. अशावेळी काय खावे आणि कसे जगावे, हा प्रश्‍न पडला आहे. इतिहासात पहिल्यांदा आमचा व्यवसाय बंद पडत असल्यामुळे परिस्थिती अवघड झाली असल्याचे उमा वडतिले यांनी सांगितले. तसेच जयश्री रोहिटे म्हणाल्या, पूर्वी 50 रुपयाला मिळणारा बांबू आज 150 रुपयाला खरेदी करावा लागत आहे. आमच्या घरात लहान मुले आहेत. काही दिवसांपासून बाजार बंद, खेडोपाडी जाता येईना. त्यात घरमालकीण कामावर येऊ नको बोलली आहे. अशावेळी घर कसे चालवणार... चूल कशी पेटवणार... आणि हे आणखीन किती दिवस चालणार...?  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com