वन-वे हटविला ! सात रस्त्यावरील शर्मा स्विटसमोरुन व कुंभार वेस ते मंगळवार पेठ मार्गावर आता दुतर्फा वाहतूक

तात्या लांडगे
Wednesday, 30 December 2020

नवीपेठेतील रस्त्यांवर आता दुतर्फा वाहतूक 
सात रस्ता ते शर्मा स्विट, कुंभार वेस ते मंगळवार पेठ आणि नवीपेठेतील अंतर्गत रस्ते (वन-वे) आता दुतर्फा वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत. दुसरीकडे दत्त चौक ते आसार मैदान, आसार मैदान ते तुषार हॉटेल, लकी चौक ते नवी पेठ, मधला मारुती ते मंगळवार पेठ आणि शिवाजी चौक ते मॅकेनिकल चौक हे एकेरी मार्ग कायम ठेवले जाणार आहेत. शहराबाहेर जाणाऱ्या मार्गांवरील वेग मर्यादेचे फलक गायब झाल्याने महापालिकेकडून त्याची माहिती घेतली जात आहे. दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी स्वतंत्र वाहतूक पोलिस कर्मचारी नियुक्‍त केला जाणार असून त्याची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून होणार आहे. 

 सोलापूर : राज्यातील अपघाती शहरांमध्ये सोलापूर टॉप-5 मध्ये आहे. शहरांतर्गत रस्त्यांवर वाहनांचा वेग ताशी 30 किमीपर्यंत बंधनकारक असतानाही तो 55 ते 65 पर्यंत पोहचला आहे. वाढत्या वेगामुळे अपघातात वाढ होत असून, आता अशा वाहनचालकांवर 1 जानेवारीपासून कडक कारवाई केली जाणार आहे. वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल, असा इशारा वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिला आहे.

नवीपेठेतील रस्त्यांवर आता दुतर्फा वाहतूक 
सात रस्ता ते शर्मा स्विट, कुंभार वेस ते मंगळवार पेठ आणि नवीपेठेतील अंतर्गत रस्ते (वन-वे) आता दुतर्फा वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत. दुसरीकडे दत्त चौक ते आसार मैदान, आसार मैदान ते तुषार हॉटेल, लकी चौक ते नवी पेठ, मधला मारुती ते मंगळवार पेठ आणि शिवाजी चौक ते मॅकेनिकल चौक हे एकेरी मार्ग कायम ठेवले जाणार आहेत. शहराबाहेर जाणाऱ्या मार्गांवरील वेग मर्यादेचे फलक गायब झाल्याने महापालिकेकडून त्याची माहिती घेतली जात आहे. दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी स्वतंत्र वाहतूक पोलिस कर्मचारी नियुक्‍त केला जाणार असून त्याची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून होणार आहे. 

शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली असून, बहुतेक वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होताना दिसत नाही. अपघातांचे प्रमाण वाढले असतानाही त्यांच्यात गांभीर्य दिसत नसल्याचेही आढळून आले आहे. रिक्षाचालक त्यांचा थांबा सोडून कुठेही थांबतात. या पार्श्‍वभूमीवर आता 64 ठिकाणी नवे रिक्षा थांबे सुरु केले जाणार असून, यापूर्वीचे शहरात 239 रिक्षा थांबे आहेत. शहरातील रस्त्यांचा सर्व्हे करण्यात आला असून, ग्रामीण पेट्रोल पंपाजवळील चौकासह अन्यठिकाणी आणखी सिग्नल बसविण्यासंदर्भात महापालिकेकडे प्रस्ताव दिला जाईल, असेही धाटे-घाडगे यानी सांगितले. दरम्यान, वाहतूक शाखेला आणखी 15 वाढीव कर्मचारी द्यावेत, अशी मागणी पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे. वाढते अपघात थांबावेत, शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, या हेतूने नववर्षात बेशिस्त वाहनचालकांवर वॉच राहिल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पार्किंगसाठी जागेचा शोध 
शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून 17 हजारांहून अधिक रिक्षा आहेत. दुसरीकडे दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांची संख्या सात लाखांपर्यंत आहे. मात्र, नवी पेठेसह महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये वाहनतळाची सोयच नाही. त्यामुळे रस्त्यालगत वाहने लावल्याने पादचाऱ्यांची पंचाईत होऊ लागली आहे. वाहनचालकांकडूनही पार्किंगची सोय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठांलगत असलेल्या महापालिकेच्या जागांचा शोध घेऊन त्याठिकाणी पार्किंगची सोय करण्याचे नियोजन वाहतूक पोलिसांनी सुरु केले आहे. नववर्षात शहरातील वाहनांच्या पार्किंगचा प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्‍त डॉ. दिपाली धाटे-घाडगे यांनी दिली.

शहरातील वाहतुकीची स्थिती 
वाहनांची संख्या 
7.83 लाख 
महापालिकेतर्फे पार्किंगची ठिकाणे 

रिक्षांची संख्या 
16,128 
एकूण रिक्षा थांबे 
303 
शहरातील वन-वे 

वाहनाचा शहरातील वेग 
55 ते 65 कि.मी. 
वाहतूक पोलिस कर्मचारी 
167 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One-way deleted ! Sharma Sweets on Seven roads, Kumbhar Wes to Mangalwar Peth Roads now open on two way traffic