सोलापुरात होणार कांद्याचा वांदा; 16 हजार हेक्‍टरवरील कांद्याचे झाले नुकसान 

सोलापुरात होणार कांद्याचा वांदा; 16 हजार हेक्‍टरवरील कांद्याचे झाले नुकसान 
Updated on: 

सोलापूर ः जिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांमध्ये झालेली अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी खूपच घातक ठरली आहे. त्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यात नदरअंदाजे जवळपास 16 हजार हेक्‍टरवरील कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची टक्केवारी 94 इतकी आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन घटणार असल्याने कांद्याचा वांदा होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

जिल्ह्यात 14 व 15 ऑक्‍टोबरला अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीचा सगळ्याच पिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा या पिकाकडे संवेदनशील पिक म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणारे पिक म्हणूनही कांद्याकडे पाहिले जाते. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. केवळ तेवढ्यावरच थांबले नाही तर कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही नुकसानीमुळे वाया गेला आहे. जे शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे त्याची वाढ व्यवस्थित झालेली नाही. ढगाळ हवामानामुळे नत्राचे प्रमाण मोठ्या प्रमाणात मिळाल्यामुळे कांद्याने माना टाकल्या आहेत. त्याचाही आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारने जिरायती व बागायती पिकांसाठी हेक्‍टरी 10 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ती मदत अतिशय तोकडी आहे. त्या मदतीतून शेतकऱ्याला कांदा लागवडीसाठी झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 
मागील वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे झाले होते. मात्र, यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने सर्व काही हिरावून नेले आहे. चांगला भाव मिळेल या मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी पिकविलेला कांदा अतिवृष्टीमुळे नाहिसा झाला आहे. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. पण, या स्थितीमुळे त्याला मानसिक धक्का बसला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा आहे. 

जिल्ह्यातील कांदा लागवडीची स्थिती 
खरीप हंगामातील कांदा लागवड 
13000 हेक्‍टर 
लेट खरीपातील लागवड 
4000 हेक्‍टर 
नजरअंदाजे कांद्याचे झालेले नुकसान 
16000 हेक्‍टर 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com