esakal | सोलापूर बाजार समितीत कांदा सात हजारांवर 
sakal

बोलून बातमी शोधा

3onions_6.jpg

कांदा दरात सुधारणा झाल्याने वाढली आवक 
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी पांढऱ्या कांद्याची एका दिवसांत 501 क्‍विंटल कांद्याची विक्री झाल्याची नोंद बाजार समितीच्या दप्तरी झाली आहे. त्यासाठी सर्वाधिक सात हजार रुपयांचा दर मिळाला. सर्वसाधारण दर साडेतीन हजार रुपयांपर्यंत होता. बाजार समितीत बुधवारी नुसत्या पांढऱ्या कांद्याची उलाढाल 17 लाख 53 हजारांवर पोहचली होती. कांद्याची लागवड म्हणावी तितकी झाली नसून अनेकांचे बियाणे उगविलेच नाहीत. तर अनेकजण आता रोपे टाकू लागले आहेत. नव्याने लागवड झालेला कांदा बाजारात उशिराने दाखल होणार असल्याने दर वाढत असल्याची चर्चा बाजार समितीत होती.

सोलापूर बाजार समितीत कांदा सात हजारांवर 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनानंतर शेतमालाचे दर सुधारले असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य दिसू लागले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 7) पांढऱ्या कांद्याला सात हजारांचा, तर लाल कांद्याला प्रतिक्‍विंटल चार हजार 600 रुपयांचा दर मिळाला आहे.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही कांदा सिझनमध्ये सुरवातीलाच कांद्याचे दर सुधारले आहेत. मंगळवारी (ता. 6) पांढऱ्या कांद्याचा दर प्रतिक्‍विंटल सहा हजार 200 रुपये होता. बुधवारी त्यात आठशे रुपयांची वाढ झाली होती. राज्यातील 35 बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव होत आहेत. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर या बाजार समित्यांमध्ये कांद्याची उलाढाल मोठी आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, कळवण, नगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला समाधानकारक दर मिळू लागला आहे. गतवर्षी सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक प्रतिक्‍विंटल 20 हजार रुपयांचा दर मिळाला होता. सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल वाढल्याने आणि बळीराजाला समाधानकारक दर मिळू लागल्याने नाशिक, नगर, पुणे, सातारा यासह कर्नाटकातूनही कांद्याची आवक वाढली आहे. 