अभियंता दिनानिमित्त ऑनलाइन सायकलिंग चॅलेंज ! सायकलपटूंनी केला 100 तासांचा फिटनेस प्रवास 

Cycle Ride
Cycle Ride
Updated on

सोलापूर : सायकलिस्ट फाउंडेशन, सोलापूर व कंसाइज इंजिनिअरिंग सोल्यूशन प्रा. लि. पिंपरी- चिंचवडतर्फे जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन फिटनेस राईडचे आयोजन करण्यात आले होते. 

या संकल्पनेमध्ये दिलेल्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त किलोमीटर पण कमी वेळेत सायकलिंग करणाऱ्या महिला श्रेणीत, पुरुष श्रेणीत व अभियंता श्रेणीत पहिल्या तीन सायकलपटूंना बक्षीस म्हणून ट्रॉफी देण्यात आल्या. तसेच सहभागी सर्व सायकलपटूंना ई-सर्टिफिकेटचे वितरण करण्यात आले. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव व लॉकडाउनमुळे नागरिक जवळपास तीन महिने घरी अडकून होते. अन्‌ लॉकडाउन काळात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सायकलिस्ट फाउंडेशन, सोलापूरतर्फे ऑनलाइन सायकलिंग राईडचे चॅलेंज देण्यात आले होते. या उपक्रमात जवळपास 100 सायकलपटूंनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. या उपक्रमास सोलापूर आणि इतर शहरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या राईडमध्ये 100 सायकलपटूंतर्फे वैयक्तिक सायकलिंग केलेल्या राईडचा एकूण प्रवास हा सुमारे 2042 किलोमीटर व 100 तासांचा एवढा होता. 28 सप्टेंबर रोजी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. 

ऑनलाइन राईडमध्ये महिला श्रेणीतले पहिले तीन सायकलपटू 

  • जान्हवी गाढे, 57.7 किमी, 3 तास 2 मिनिटे 
  • श्रद्धा सक्करगी, 52.5 किमी, 3 तास 8 मिनिटे 
  • मित्तल पटेल, 26.44 किमी, 1 तास 45 मिनिटे 

पुरुष श्रेणी 

  • राजेंद्र डांगे, 244.23 किमी, 9 तास, 17 मिनिटे 
  • अवधुत जगताप, 189.83 किमी, 9 तास, 9 मिनिटे 
  • नितीन खंडागळे, 141.39 किमी, 7 तास, 28 मिनिटे 

अभियंता श्रेणी 

  1. स्वप्नील आळंद, 71.1 किमी, 3 तास, 29 मिनिटे 
  2. निखिल मालावडे, 41.8 किमी, 2 तास, 30 मिनिटे 
  • संतोष कुलकर्णी, 36.56 किमी, 1 तास, 52 मिनिटे 

या विजेत्यांना कंसाइज इंजिनिअरिंग सोल्यूशन प्रा. लि., पिंपरी- चिंचवडतर्फे बक्षिसे देण्यात आली. या वेळी कंपनीचे व्यवस्थापक मनोजकुमार गायकवाड हे ऑनलाइन कार्यक्रमास उपस्थित होते. हा कार्यक्रम स्मार्ट सिटीच्या ऑफिसमध्ये सामाजिक सुरक्षित अंतर ठेवून करण्यात आला. या वेळी त्र्यंबक ढेंगळे-पाटील, सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, प्रा. नरेंद्र काटीकर, भारतीय व्यापार नौदल अधिकारी विश्वनाथ गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ढेंगळे-पाटील यांनी स्मार्ट सोलापूरमध्ये सायकलिंगची मोठी चळवळ उभी राहण्यासाठी सायकलिस्ट फाउंडेशनचे प्रयत्न हे अतिशय उत्तम आहेत आणि सायकलिंगमुळे होणारे फायदे ऑनलाइन सहभागी झालेल्या लोकांना आवर्जून सांगितले. 

प्रा. शंकर नवले आणि नौदल अधिकारी श्री. गायकवाड यांनी फिटनेसचा उपयोग समुद्रात जहाजेवर असताना कशा पद्धतीने होतो आणि शारीरिक क्षमता असेल तर माणूस मानसिकदृष्ट्या देखील सक्षम राहू शकतो, असे नमूद केले. 

उपक्रमाचा वाढता प्रतिसाद आणि होणारी मागणी पाहता लवकरच ऑनलाइन फिटनेस चॅलेंजचा दुसरा टप्पा आखण्यात येईल, असे सायकलिस्ट फाउंडेशन, सोलापूरचे अध्यक्ष प्रा. सारंग तारे यांनी सांगितले. या उपक्रमामध्ये भाऊराव भोसले, शीतल कोठारी, रजनीकांत जाधव, चेतन लिगाडे, अभिषेक दुलंगे यांचे सहकार्य लाभले. 

येणाऱ्या काळात होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन फिटनेस चॅलेंजच्या माहितीसाठी 9975924942, 9049659222 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन सायकलिस्ट फाउंडेशन, सोलापूरतर्फे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com