ग्रामीण भागामध्ये ऑनलाइन शिक्षणाच्या भडीमाराने विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त, कुठे? ते वाचा

mobile education.jpg
mobile education.jpg
Updated on

केतूर(सोलापूर)ः ऑनलाइन शिक्षणाच्या प्रयोगामध्ये ग्रामीण भागात पालकासह विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या पोस्टच्या भडीमाराने विद्यार्थ्यासह पालक त्रस्त झाले आहेत. शिक्षक व विद्यार्थ्यामध्ये कोणताही संवाद व विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्याने पालकामध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. 

ग्रामीण भागातील सर्वच पालकांची आर्थिक परिस्थिती न पाहता शासनाने व शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणाचा आग्रह धरला गेला आहे. या ऑनलाइन शिक्षणाचासाठी मोबाईलव पोस्टचा भडीमार केला जात आहे. ज्या मोबाईलला शाळेत वापरण्यास बंदी होती तोच मोबाईल विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार आहे किंवा देत आहे. मोबाईल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना वेगळाच मनस्ताप होऊ लागला आहे. हा ऑनलाइन शिक्षणाचा मारा त्वरित थांबवावा अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांना पालकांतून होत आहे.ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक त्रुटी,समस्या आहेत तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत आहे. शिक्षकासोबत न होणारा संवाद व मार्गदर्शनाअभावी विद्यार्थी देखील अडचणीत सापडले आहेत. 

गोरगरीब, कष्टकरी, दलित, वंचित, मजूर, छोटे व्यावसायिक महामारी कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकाडाउनमुळे संकटात आले आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहेत. अशा परिस्थितीत मुलांना महागडे मोबाईल ऑनलाईन शिक्षणासाठी घेणे अवघड व त्रासदायक ठरत आहे. मुलांना महागडे मोबाईल दिले तरी ऑनलाइन शिक्षणा व्यतिरिक्त मुले मोबाईलचा गैरवापर करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा खेळखंडोबा बंद करून सकारात्मक निर्णय घ्यावा अशीही मागणी होत आहे. 

शिक्षणाबद्दल सकारात्मक निर्णय घ्यावा 
ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा बंद करून सकारात्मक निर्णय शासनाने घ्यावा 
-बळीराम गीते,पालक,केतूर. 

शिक्षक व विद्यार्थ्यामधील संवाद हरवला 
ऑनलाइन शिक्षणामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे जे नाते आहे ते नातेच संपत आहे. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष संबंध येणार नाही 
- दिनेश माने, पालक केतूर.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Council Election Strategy in Action: BJP Mobilizes Corporators, Ensures Early Voting
Court Battle Looms Over Chemical Treatment of Vitthal-Rukmini Idol in Pandharpur
solapur
MLA Devendra Kothe  
Marathi News Esakal
www.esakal.com