अल्पसंख्याक उमेदवारांसाठी गुरुवारपासून ऑनलाईन रोजगार मेळावा 

प्रमोद बोडके
Friday, 23 October 2020

448 रिक्त पदे 
रोजगार मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्‍ट्रिशियन, सेल्स एक्‍झिकेटीव्ह, सर्व्हिस इंजिनिअर, कॉम्प्युटर ऑपरेटर, इन्शुरन्स ×डव्हायझर, नर्सिंग फार्मासिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, सुपरवायझर, 10 वी पास/नापास, 12वी, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी अशा प्रकारची एकूण 448 रिक्तपदे आहेत. यासाठी सात उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उमेदवारांची ऑनलाईन मागणी केलेली आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडिओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन याद्वारे घेण्यात येणार आहेत. 

सोलापूर : जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील बेरोजगारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 29, 30, 31 ऑक्‍टोबर आणि 1,2,3 नोव्हेंबरला अल्पसंख्याक विशेष ऑनलाईन रोजगार मेळावा होणार आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी केले आहे. 

लॉकडाऊननंतर शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहून कंपन्या/ औद्योगिक आस्थापना, व्यवसाय उद्योग सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. नव्याने व्यवसाय, उद्योग सुरु करताना जिल्ह्यातील आस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज निर्माण झाली असून स्थानिक बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी http://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे, अधिक माहितीसाठी 0217-2622113 या दूरध्वनीवर अथवा solapurrojgar1@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online job fair for minority candidates from Thursday