ऑनलाइन टेस्ट राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ठरल्या फायदेशीर 

संतोष सिरसट 
Saturday, 5 September 2020

विद्यार्थ्यांसाठी ऍपचा वापर फायदेशीर 
कोरोनामुळे राज्यभर ऑनलाईन टेस्ट गुगल फॉर्म ऍपचा वापर करुन शहरी असो किंवा ग्रामीण भागातील मुले असो त्या टेस्ट सोडवत आहेत. आज ही शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण चालूच आहे.नदीक्षा ऍप, मित्रा ऍपच्या माध्यमातून पाठानुसार व्हीडीओ उपलब्ध आहेत. शिक्षक रोज जो पाठ शिकवणार आहेत, त्या पाठाची लिंक ग्रुपला पाठवतात. त्यातून विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. 

सोलापूर ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोलेवस्ती-रांझणी (ता. पंढरपूर) येथील शिक्षक ज्ञानेश्‍वर विजागत यांनी विद्यार्थ्यांसाठी पाठनिहाय तयार केलेल्या टेस्ट फायदेशीर ठरत आहेत. राज्यभरातील विद्यार्थी या टेस्टचा उपयोग आपल्या दैनंदिन शिक्षणात करुन घेत आहेत. तंत्रस्नेही शिक्षक असलेले विजागत हे जिल्हा परिषदेच्या यु ट्युब एज्युकेशनमध्येही व्हिडीओ एडीटर म्हणून काम पाहत आहेत. 

जिल्हा परिषदेने "यू ट्युब इन एज्युकेशन' हा उपक्रम राबविला आहे. कोरोनाच्या काळात शिक्षक घरी बसून व्हिडीओ तयार करुन तंत्रस्नेही शिक्षकांना तज्ञ टिममार्फत तो व्हिडीओ तयार करण्यासाठी पाठवतात. त्यामध्ये व्हिडीओ इडिटर म्हणून काम करण्याची संधी विजागत यांना मिळाली आहे. घरी बसून काम होत आहे, त्यामुळे जगातील कोणत्याही मुलांना घरी बसुन इयत्तानिहाय, विषयनिहाय शिक्षण घेता येत आहे. हे "शाळा बंद, शिक्षण चालू'चे फलित आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी प्रकाश वायचळ, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड व तंत्रस्नेही टिम, तज्ञ शिक्षकांच्या टिमचे योगदान आहे. 

आज जरी मुले शिकत असली तरी त्यांच्या मनावर व भावनिक विकासावरही मोठा परिणाम होणार आहे. पालकांना ही शिक्षणाचे महत्व पटू लागल्याने पालकही आता ऑनलाईन शिक्षण देण्यात मागे पडत नाहीत हे यावरुन दिसून येते. आज ही पालकांनाच नाही तर शिक्षकांपासून अधिकाऱ्यांपर्यत सर्वजण ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी नवनवीन प्रयोग राबवत आहेत. त्यामुळे पालकांनीही मुलांच्या ऑनलाईन ऍक्‍टीव्हीटीवर लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षक केवळ ऑनलाईनच काम करत नाहीत तर रात्रपाळी, दिवसपाळी करुन पोस्ट नाका, कोविड सेंटरवर "कोरोना वॉरीयर्स' म्हणूनही काम करत आहेत. ग्रामीण भागात पालकांकडे स्मार्ट फोन नसला तरी वाडी, तांडा, वस्तीवर मुलांच्या घरी जाऊन मुलांशी चर्चा व संवाद करुन शिक्षण घेण्यास विजागत प्रेरणा देत आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online tests are beneficial for students across the state