शहरात आता अवघे 822 रुग्ण! आज 60 पॉझिटिव्ह अन्‌ दोघांचा मृत्यू

तात्या लांडगे
Sunday, 13 September 2020

ठळक बाबी...

  • शहरातील 72 हजार 89 संशयितांची झाली आजवर कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात आढळले साडेसात हजार पॉझिटिव्ह; 822 रुग्णांवर उपचार
  • आज 524 जणांच्या अहवालात 41 पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू
  • को-मॉर्बिडचा सर्व्हे सुरु असतानाही 65 वर्षांवरील व्यक्‍तीच कोरोनाचा बळी
  • शहरातील एकूण रुग्णांपैकी 443 रुग्णांचा मृत्यू; आज 67 वर्षाचे पुरुष, 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्येने सोडसात हजाराचा टप्पा गाठला आहे. त्यातील 443 रुग्णांचा मृत्यू झाला असून आज दोघे कोरोनाचे बळी ठरले आहेत. समाधानकारक बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी सहा हजार 235 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 822 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील बहूतांश रुग्ण कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून उपचार घेत आहेत.

 

ठळक बाबी...

  • शहरातील 72 हजार 89 संशयितांची झाली आजवर कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात आढळले साडेसात हजार पॉझिटिव्ह; 822 रुग्णांवर उपचार
  • आज 524 जणांच्या अहवालात 41 पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू
  • को-मॉर्बिडचा सर्व्हे सुरु असतानाही 65 वर्षांवरील व्यक्‍तीच कोरोनाचा बळी
  • शहरातील एकूण रुग्णांपैकी 443 रुग्णांचा मृत्यू; आज 67 वर्षाचे पुरुष, 70 वर्षीय महिलेचा मृत्यू

 

भवानी पेठ परिसरातील 70 वर्षीय महिला 3 सप्टेंबरला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाली होती. मात्र, शनिवारी (ता. 12) त्यांचा मृत्यू झाला. तर सम्राट चौक परिसरातील 67 वर्षीय पुरुष 4 सप्टेंबरला यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. मात्र, शुक्रवारी (ता. 11) त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे. आज शहरात सोनी सिटी (दमाणी नगर), गणेश नगर, मारुती चॉंद पार्क, तुळशी विहार अपार्टमेंट, तापी अपार्टमेंट, भारती विद्यापीठ परिसर (विजयपूर रोड), रोहिणी नगर (सैफूल), कल्याण नगर भाग-एक, काळी मशिदीजवळ, चिंतामणी अपार्टमेंट (आसरा चौक), पश्‍चिम मंगळवार पेठ (बाळीवेस), महादेव नगर, रमाकांत कर्णिक नगर (आरकल गार्डनमागे), निलम नगर, एकता नगर, सुभाष शहा नगर, भवानी पेठ, नाथ प्राईड (सिव्हिल हॉस्पिटलजवळ), निराळे वस्ती, किसान संकुल (अक्‍कलकोट रोड), शिवाजी नगर, डांगे नगर, नाकोडा युनिटी (बाळे), कविता नगर (पोलिस लाईन), विडी घरकूल, गंगाई अपार्टमेंट (बलिदान चौक), गणेश नगर (तुळजापूर रोड), मंत्री चंडक (भवानी पेठ), राघवेंद्र नगर, अमृत नगर, सिमला नगर, स्नेहल पार्क, बॅंक कॉलनी, वामन नगर, गीता नगर, नाथ प्लाझा (जुळे सोलापूर), देगाव, प्रतिक अपार्टमेंट (गांधी नगर), ताकमोगे वस्ती, बी ग्रूप विडी घरकूल, विष्णू प्रिया अपार्टमेंट (नवीन आरटीओ कार्यालयाजवळ), यश नगर, पाथरुठ चौक (गेंट्याल टॉकिजजवळ) आणि गवळी वस्ती (लक्ष्मी पेठ) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 822 patients in the city Today, 60 positive and two died