शहरात आज सापडले अवघे सहा रुग्ण ! सुट्टीमुळे ऍन्टीजेन टेस्ट झाल्याच नाहीत 

तात्या लांडगे
Monday, 26 October 2020

ठळक बाबी... 

  • शहरातील 90 हजार 285 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 425 रुग्ण 
  • आज 40 संशयितांमध्ये सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 
  • विजयादशीनिमित्त शहरातील नागरी आरोग्य केंद्रांमधील ऍन्टीजेन टेस्ट ठेवली होती बंद 
  • मृतांची संख्या जैसे थे; दहा रुग्णांची कोरोनावर मात 

सोलापूर : शहरातील कोरोनाची स्थिती आता सुधारु लागली आहे. सद्यस्थितीत शहरात अवघे 433 रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दसऱ्यानिमित्त रविवारी (ता. 25) शहरातील सर्वच नागरी आरोग्य केंद्रांमधील कामकाज बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे ऍन्टीजेन टेस्टचे कामही बंदच होते. तरीही 44 संशयितांनी 'आरटीपीसीआर' टेस्ट करुन घेतली. त्यात सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

 

ठळक बाबी... 

  • शहरातील 90 हजार 285 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 425 रुग्ण 
  • आज 40 संशयितांमध्ये सहा जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 
  • विजयादशीनिमित्त शहरातील नागरी आरोग्य केंद्रांमधील ऍन्टीजेन टेस्ट ठेवली होती बंद 
  • मृतांची संख्या जैसे थे; दहा रुग्णांची कोरोनावर मात 

 

आज शहरातील वर्धमान नगर, भवानी पेठ, स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), मंगल रेजेन्सी (जुळे सोलापूर), साहिल नगर (मजरेवाडी) आणि गैबिपीर झोपडपट्टी येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून शिक्षकांच्या मदतीने घरोघरी को- मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे सुरु आहे. दुसरीकडे महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना सक्‍त सूचना देऊन तापसदृश्‍य रुग्णांची कोरोना टेस्ट बंधनकारक केली. त्यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. दुसरीकडे कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक नगरांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होऊ लागला असून काही नगरांमध्ये आता एकही रुग्ण नसल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तरीही नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायजरचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only six patients found in the solapur city today! No antigen tests were performed due to the holiday