
सी. बी. खेडगी महाविद्यालय अक्कलकोट, संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रूप यांच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या अँटी रॅगिंग अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर युनिटच्या वतीने व्यवस्थापन रॅगिंग व मानसिक तणावाचे व्यवस्थापन या विषयावर ऑनलाइन वेबिनार घेण्यात आला,
सोलापूर, ः विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यात ताणतणावाचे व्यवस्थापन केल्यास जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाणे शक्य होऊ शकते, असे मत युथ होस्टेलचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी व्यक्त केले.
सी. बी. खेडगी महाविद्यालय अक्कलकोट, संतोष भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रूप यांच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या अँटी रॅगिंग अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर युनिटच्या वतीने व्यवस्थापन रॅगिंग व मानसिक तणावाचे व्यवस्थापन या विषयावर ऑनलाइन वेबिनार घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून रॅगिंगच्या घटना देश व विदेशात होत आहेत. याबाबत देशातदेखील अनेक प्रकारचे कायदे केले आहेत. परंतु कायद्याने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी शासनाकडून जनजागृती उपक्रम राबवण्याची कायम गरज असते. केंद्र शासनाने कायद्यात कठोर शिक्षेची तरतूदही केली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी पालक व शिक्षकांना वेळीच सांगण्याची सवय केली पाहिजे. म्हणजे संभव्य मोठ्या संकटातून त्यांची सुटका होऊ शकते असे डॉ. मेतन यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बधाले यांनी केले. संध्या इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी डॉ. प्रा. अंधारे, प्रा. बाबाराव सुरवसे यांनी परिश्रम घेतले.
स्वत:चे चारित्र्य विकसित करा
स्वतःचे चारित्र्य विकसित करण्याचे ध्येय विद्यार्थ्यांनी जपले पाहिजे. त्यासाठी आदर्श व्यक्तींचे चरित्र वाचण्याची सवय केली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी महापुरुषांच्या जीवनातील प्रसंग, आलेल्या संकटावरील मात करण्याची हातोटी यावर विश्लेषण केले.