ब्रेकिंग : दुकानांना वेळ वाढवून देण्यास पंढरपूर व्यापारी कमिटीचाच विरोध 

भारत नागणे 
शुक्रवार, 10 जुलै 2020

...तर कोरोनाचा संसर्ग वाढेल 
दुकानांना वेळ वाढवून देण्यात आल्याने बाजारात पुन्हा गर्दी वाढण्याची शक्‍यता आहे.  सध्या संपर्कातून कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाने दिलेली वाढीव वेळ कमी करून पूर्वी प्रमाणेच सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत करावी, अशी मागणी व्यापारी कमेटीचे अध्यक्ष पद्मकुमार गांधी, उपाध्यक्ष विजयकुमार परदेशी, धीरज म्हमाणे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहर व तालुक्‍यात कोरोनाचा संसर्ग झापट्याने वाढू लागला आहे. अशातच पंढरपूर शहरातील दुकाने आणि अस्थापनांना सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. पुर्वीपेक्षा दोन तासांनी वेळ वाढवली आहे. 
दुकाने उघडे ठेवण्यास वेळ वाढवून देण्यास पंढरपूर येथील खुद्द व्यापारी कमेटीनेच विरोध केला आहे. या संदर्भात व्यापारी कमिटीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना लेखी निवेदन देवून वेळ वाढवून देऊ नये, अशी मागणी केली आहे. व्यापारी कमिटीचेच विरोध केल्याने व्यापाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. 
मागील पंधरा दिवसांपासून शहर व तालुक्‍यात कोरोनाची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत 48 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये एका वृध्दाचा मृत्यू झाला आहे. 16 जण बरे झाले आहेत. सध्या 36 जणांवर पंढरपूर व सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. आज पंढरपुरात सहा नवे रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरात आणखी रूग्ण वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. पंढरपूर शहरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतानाच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शहर व तालुक्‍यातील दुकाने व अवस्थापाना दोन तासांनी वेळ वाढवून दिला आहे. आतापर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली होती. त्यामध्ये गुरूवार (ता. 9) पासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला आहे. मात्र पंढरपूर येथील व्यापारी कमिटीने या विरोध केला आहे. 

संपादन : वैभव गाढवे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition of Pandharpur Traders Committee to extend the time of shops