नगरपरिषद इमारत हलविण्यास चार माजी सरपंचासह विविध राजकीय पक्षांचा विरोध 

चंद्रकांत देवकते
Saturday, 24 October 2020

या निर्णयाला प्रथम शिवसेनेसह शहरातील चार माजी सरपंच व विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला आहे .कारण याच परिसरात तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन, पंचायत समिती ,तलाठी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम , भुमि अभिलेख, संजय गांधी निराधार योजना , आदीसह अन्य महत्वाची कार्यालये व बॅका याच परिसरात आहेत. त्यामुळे नागरिकांना सर्वच दृष्टीने सध्या आहे त्याच ठिकाणी नगर परिषद राहणे सोईचे ठरणार आहे . नियोजीत नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत शहराच्या एका टोकाला होण्याऐवजी मध्यवर्ती ठिकाणीच होणे अत्यंत आवश्‍यक आहे. असा निर्णय घेऊन वेगवेगळ्या मार्गाने या साठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले .

मोहोळ(सोलापूर)ः शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारी सध्याची नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत बहुमताच्या जोरावर इतरत्र हलविण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांकडून सुरू असुन हा प्रयत्न हाणुन पाडण्यासाठी जनआंदोलनासह वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार 'सध्या आहे त्याच ठिकाणी नगर परिषद रहावी ' या साठी बोलाविण्यात आलेल्या शहरातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला . 

हेही वाचाः अतिवृष्टी व महापूरानंतर आता द्राक्षबागांवर कीडरोगांचे संकट 

याबाबत अधिक माहीती अशी की, मोहोळ शहरातील नगरपरिषदेच्या नुतन प्रशासकीय वास्तुसाठी शासनाचा साडेचार कोटी रुपये निधी मंजुर झाला आहे.परंतु या नियोजीत इमारतीसाठी अनेक तांत्रीक बाबीची पुर्तता करणेही गरजेचे आहे. त्या दृष्टीने सत्ताधाऱ्यांनी नविन इमारत होण्याच्या दृष्टीने ज्या चार जागा निवडल्या होत्या त्या पैकी आठवडा बाजारातील जागा आठ विरूध्द पाच या बहुमताने निश्‍चीत करण्यात आली आहे. 

हेही वाचाः वैशाली डोंबाळे यांच्यामुळे विडी कामगार निराधार मुलांना आधार 

या निर्णयाला प्रथम शिवसेनेसह शहरातील चार माजी सरपंच व विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला आहे .कारण याच परिसरात तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन, पंचायत समिती ,तलाठी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम , भुमि अभिलेख, संजय गांधी निराधार योजना , आदीसह अन्य महत्वाची कार्यालये व बॅका याच परिसरात आहेत. त्यामुळे नागरिकांना सर्वच दृष्टीने सध्या आहे त्याच ठिकाणी नगर परिषद राहणे सोईचे ठरणार आहे . नियोजीत नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत शहराच्या एका टोकाला होण्याऐवजी मध्यवर्ती ठिकाणीच होणे अत्यंत आवश्‍यक आहे. असा निर्णय घेऊन वेगवेगळ्या मार्गाने या साठी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिपक गायकवाड यांनी वेळ पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन नगर परिषदेचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न करू असे सांगितले . तर सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक संतोष गायकवाड व ऍड हिंदुराव देशमुख यांच्यावर न्यायालयीन लढाईची जबाबदारी सोपविण्यात आली . यावेळी प्रामुख्याने दिपक गायकवाड यांच्यासह माजी सरपंच व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख माजी सरपंच व राजन पाटलांचे कट्टर समर्थक ब्रह्मदेव भोसले , माजी सरपंच बिलाल शेख, माजी सरपंच व विद्यमान नगरसेविका सिमा पाटील, प्रतापसिंह गरड, काका देशमुख, संजय क्षिरसागर नगरसेवक सत्यवान देशमुख, महादेव गोडसे, चंदु गोडसे, सिकंदर बोंगे, देवानंद सोनटक्के, महेश देशमुख, दिलीप गायकवाड, किरण शिंदे आदीसह बहुसंख्य राजकीय नेते व नागरिक उपस्थित होते .  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition from various political parties, including four former sarpanches, to move the municipal building