सोलापुरातील कोरोना बाधित क्षेत्राचे जीआयएस मॅपिंग करण्याचे आदेश

सोलापुरातील कोरोना बाधित क्षेत्राचे जीआयएस मॅपिंग करण्याचे आदेश
Updated on

सोलापूर :  कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराचे जीआयएस मॅपिंग तयार करून पाठविण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी महापालिकेस
दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत 65 प्रतिबंधित परिसराचे मॅपिंग तयार झाले असून, उर्वरित परिसराचे मॅपिंग तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जीआयएस मॅपिंगमुळे
राज्यातील निर्णयक्षम यंत्रणेला जागेवर बसून परिसरातील स्थिती पाहता येणार आहे. 

जीआयएस मॅपिंगमध्ये प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसरात किती लोकसंख्या आहे, या परिसरात कोणती दुकाने, व्यावसायिक संस्था आहेत, जीवनावश्यक साहित्याची
किती दुकाने आहेत याचीही माहिती दिली जाणार आहे. रुग्ण आढळलेल्या व्यक्तीच्या घरापासून किती क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आला आहे याचीही माहिती एका क्लिकवर
उपलब्ध होणार आहे. या माहितीच्या आधारे हा परिसर किती दिवस प्रतिबंधित ठेवायचा याबाबतचा निर्णय घेण्यासही मदत होणार आहे.

सोलापूर पोलिस आयुक्तालयाने काल शुक्रवारपर्यंत 78 ठिकाणचे परिसर प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहेत. त्यापैकी महापालिकेने आतापर्यंत 65 ठिकाणचे मॅपिंग तयार केले आहे. महापालिकेच्या संगणक विभागामार्फत हे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मॅपिंगद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे लॅाकडाऊनच्या कालावधीत कोणत्या व्यवसायाला परवानगी द्यायची किंवा कायम ठेवायची याचाही निर्णय घेण्यास मदत होणार आहे. 


सोलापुरातील पोलिस ठाणेनिहाय 78 प्रतिबंधित परिसर

- सदर बझार : भारतरत्न इंदिरा नगर, मदर इंडिया झोपडपट्टी, कुरबान हुसेन नगर, शास्त्रीनगर- एक, मोहम्मदिया मोहल्ला, बापूजी नगर, पोटफाडी चौक, रंगभवन यशवंत नगर, चांदणी चौक, लोधी खाना, बेडर पूल, पंचशील नगर, यशवंत हाऊसिंग सोसायटी, कुमठा नाका, शिवाजीनगर सात रस्ता, ओरोनोका कॉलनी रंगभवन, संजय नगर, कुमठा नाका, तक्षशिल नगर, कुंभार गल्ली लष्कर, केशव नगर पोलिस वसाहत, शास्त्रीनगर, शानदार चौक, लष्कर सदर बाझार, रेल्वे स्टेशन, शामा नगर, इंदिरा नगर भाग- दोन, सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी, आंबेडकर नगर, शिक्षक हाउसिंग सोसायटी, शिवराय बिल्डींग सोसायटी, जुने मेडिकल कॉलेज 

- फौजदार चावडी : संतोष नगर, बाळे, किल्ला पोलिस लाईन, गायत्री नगर, वसंत विहार, मिलिंद नगर, बुधवार पेठ, नाथ एक्सलन्सी, कल्पना थिएटरमागे, वडार गल्ली

- जेलरोड : तेलंगी पाच्छा पेठ, न्यू पाच्छा पेठ, पोलिस मुख्यालय वसाहत कॉर्नर, न्यू पाच्छा पेठ गायकवाड हॉस्पिटल, संत तुकाराम चौक, पंचमुखी हनुमान नगर ते चिप्पा मार्केट, एकता नगर, साईबाबा चौक, सिद्धेश्वर पेठ, पद्मा पानशॉपमागील बोळ, गिता नगर न्यू पाच्छा पेठ, मार्बल कलेक्शन बोळ, मुस्लीम पाच्छा पेठ)

- जोडभावी पेठ : जोशी गल्ली, रविवार पेठ, जग्ग्नाथ नगर, शेळगी, डॉ. मेतन हॉस्पिटल बोळ, मराठा वस्ती, मंत्री चंडक कॉलनी, भिमरत्न चौक, बुधवार पेठ

- एमआयडीसी : शिवगंगा नगर भाग-4, हुच्चेश्वर नगर भाग-3, मार्कंडेय नगर कुमठा नाका, भाग्यलक्ष्मी नगर, भिमाशंकर नगर, नई जिंदगी, नीलम नगर, ताई चौक, गवळी वस्ती, पद्मा नगर, एकता नगर, शिवगंगा नगर भाग 5, संजीव नगर, बजरंग नगर, समृद्धी हेरिटेज, कुमारस्वामी नगर

- विजापूर नाका : एसआरपी कॅम्प, साईनाथ नगर, सहारा नगर, नई जिंदगी मनोरमा नगर, गजानन नगर, समृद्धी हेरिटेज, आसरा हाउसिंग सोसायटी, सिद्धेश्वर नगर भाग एक

- सलगर वस्ती : संत रोहिदास नगर, देगाव 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com