माळशिरस तालुक्‍यातील 108 पैकी तब्बल 82 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव 

शशीकांत कडबाने 
Thursday, 3 September 2020

तालुक्‍यात एकूण 1464 रूग्ण आढळले आहेत. यापैकी 810 रूग्णांना बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 624 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तालुक्‍यात 30 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

अकलूज (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून तालुक्‍यातील एकूण 108 गावांपैकी 82 गावात पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून एकूण रूग्णसंख्या 1464 वर गेली आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 24 मार्चला संपूर्ण देशभर लॉकडाउन जाहीर केला. माळशिरस तालुक्‍यात सुरवातीच्या दोन्ही लॉकडाउनमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. मात्र लॉकडाऊन तीनमध्ये तालुक्‍यातील संग्रामनगर-अकलूज येथे पहिल्यांदा दोन रुग्ण आढळले. प्रशासनाने या दोन रूग्णांसह संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण करीत कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत असतानाच लॉकडाउन चार व पाचमध्ये कोरोनाचा नजीकच्या गावात प्रादुर्भाव वाढला. त्यानंतर सरकारने आनलॉक सुरु केले आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच गेला. संग्रामनगर येथील दोन रुग्णांनी सुरु झालेला कोरोना संसर्ग आज तालुक्‍यातील 82 गावात पसरला आहे. 
तालुक्‍यातील अकलूज येथे सर्वाधिक 368 रूग्ण, यशवंतनगर येथे 95, माळीनगर येथे 72, बोरगाव येथे 69, वेळापूर येथे 66, संग्रामनगर येथे 60, एकशिव 5, कोंडभावी 2, माळेवाडी 13, शिंदेवाडी, गुरसाळे व निमगाव येथे प्रत्येकी 9, विझोरी 22, सदाशिवनगर 13, नातेपुते 39, मांडवे 34, गिरवी 3, महाळुंग 46, उघडेवाडी 6, वाफेगाव 6, लवंग 14, उंबरे (वे) 3, सवतगाव 18, श्रीपूर 37, धर्मपुरी 21, माळखांबी 10, फोंडशिरस 19, दहीगाव 12, खंडाळी 6, चाकोरे 13, कन्हेर 30, संगम 12, गिरझणी 6, नेवरे 4, मेडद 3, पडसमंडळ 12, बागेचीवाडी 17, पिलीव 14, शेंडेचिंच 7, पठाणवस्ती 6, वाघोली 6, कोंडारपट्ट 35, आनंदनगर, चौडेश्वरवाडी, बिजवडी मिरे येथे प्रत्येकी 5, तांबवे 8, तांदुळवाडी 8, कुसमोड 6, दसूर 4, बोंडले 11, देशमुखवाडी 3, डोंबाळवाडी (मो) 12, गोरडवाडी 8, मळोली 4, मारकडवाडी 7, भांबुर्डी 6, मोरोची 21, जांबूड 6, जाधववाडी 3, गारवाड 10, खुडूस 4, तामशिदवाडी 3, पिसेवाडी 3, माळशिरस 34 रूग्ण, गणेशगाव, पानीव, उंबरेदहीगाव, फळवणी, तिरवंडी, चांदापुरी, पुरंदावडे, तरंगफळ, झिंजेवस्ती, माणकी येथे प्रत्येकी दोन तर पिंपरी शिंगोर्णी, लोंढे मोहितेवाडी, मोटेवाडी, पिरळे, पिंपरी, तोंडले येथे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण 1464 रूग्ण आढळले आहेत. यापैकी 810 रूग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर 624 रूग्णांवर औषधोपचार चालू आहेत. आतापर्यंत तालुक्‍यात 30 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Outbreak of corona in 82 out of 108 villages of Malshiras taluka