
कुर्डू (सोलापूर) : पाकिस्तान मधून सुटका होऊन भारताच्या ताब्यात देऊन ही तीन महिने झाले तरी देखील लऊळ ता माढा गावचे ४३ वर्षीय सत्यवान निवृत्ती भोंग हे शेतकरी कुटूबिंयाच्या भेटीपासून कोसोदुरच राहिले होते पण नातेवाईकांनी केलेल्या प्रयत्नां यश आले असुन त्यांना ताब्यात घेण्यासाठी कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे स.पो.नी हनुमंत वाघमारे,पो.हवालदार समिर पठाण व दिपक जगताप व नातेवाईक गणेश भोंग यांचे पथक आज शनिवार सकाळी कुर्डूवाडी रेल्वे स्टेशन वरुन लोकमान्य एक्स्प्रेस ने रवाना झाले आहे.
सरकारी अनास्था कशी असते.हेच या निमित्ताने भोग यांच्या प्रकरणावरुन समोर आले आहे. दरम्यान भोंग याचे कुटूबिंय मात्र काळजीतच पडलेले आहेत.पाकिस्तान च्या तावडीतून सुटका होऊन देखील त्यांच्या यातना काय थांबायचे नावच घेत नाहीत. ते सध्या अमृतसरमध्येच अडकुन पडलेत.अमृतसरमधुन आणण्यासाठी महाराष्ट्र प्रशासनाकडुन उशीर झाला अन् राज्याची ढिम्म प्रशासन व्यवस्थेचे प्रदर्शन या प्रकरणावरुन समोर आले आहे.
सत्यवान यांना उपचारासाठी दवाखान्यात पुण्यात घेऊन गेल्यानंतर तिथुन ते
हरवले असल्याची माहीती कुटूंबियांकडुन देण्यात आली आहे.
२०१३ साली पुण्यात हरवले गेले होते.अशी माहिती देखील मिळाली आहे.
लऊळ गावच्या हद्दीत पठाण साहेब देवस्थान च्या नजीक वास्तव्यास असलेले शेतकरी भोंग हे शेतीवर उदरनिर्वाह करीत आहेत. प्रभाकर,भारत,दिगंबर या भावंडासह आई समवेत एकत्रित राहतात.
कौटुंबिक कलहा मुळे सत्यवान यांना कुटूंबातुन विभक्त होण्याची वेळ आली मुळे सत्यवान यांचे मानसिक संतुलन बिघडले.म्हणून त्यांची पत्नी पल्लवी यांनी २०१३ मध्ये त्यांना पुण्यात घेऊन गेले.अन् तिथुनच ते हरवले गेले.याची माहिती पल्लवी यांनी आई, भाव, दिर, सासु सासरे यांना दिली होती. तेव्हापासुन पल्लवी या दोन मुलासमवेत कुर्डूवाडीतच राहत आहेत.त्यांनी सत्यवान यांच्या बेपत्ता असलेल्याची खबर देखील देण्यात आलेली होती.
फेब्रुवारी २०२० मध्ये कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात सत्यवान याची विचारणा करण्यात आली.पोलिसांनी सत्यवान यांची माहिती व खात्री करणेकामी कुटूबिंयाना बोलावले.त्यावर सत्यवानचे भाऊ दिगंबर हे पोलिस ठाण्यात आल्यावर त्यांना सत्यवान हे पाकिस्तान च्या तुरुंगात कैदेत असल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली.
आवश्यक कागदपत्राची पाहणी अन् चौकशी करुन ओळख पटल्यानंतर पाकिस्तान देशातील प्रशासनाने सत्यवान भोंग ची सुटका केली व त्यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले. भारतात येऊन सत्यवान यांना येऊन जवळपास तीन महिने लोटुन गेले असतानाही अमृतसरमध्येच त्यांचा मुक्काम तर रखडलेलाच आहेच शिवाय यातना देखील कायम आहेत.सत्यवान पुण्यातुन पाकिस्तान मध्ये गेलेच कसे ?तिथं पर्यत ते कसे पोहचले..याचा उलगडा सत्यवान गावी आल्यानंतर च पोलिसांच्या चौकशीतुन होणार आहे.
स्वगृही परतण्यासाठी यांनी केली मदत
हा सर्व घडलेला प्रकार लऊळ पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांना माजी उपसभापती प्रताप नलवडे यांनी, नुतन ग्रामपंचायत सदस्य पवन भोंग यांनी सांगितला व सत्यवान भोंग यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने, धनराज शिंदे यांनी माढा वेल्फेअर फाऊंडेश च्या वतीने कुर्डूवाडी ते अमृतसर व परतीच्या प्रवासासह लागणारा रेल्वे रिझर्व्हेशन चा खर्च सुमारे वीस हजार रुपये ची मदत केली.
अशी होणार प्रक्रिया
कुर्डुवाडी पोलिस पथक सोमवार १फेब्रुवारी २०२१रोजी सकाळी आमृतर येथे पोहचणार, अमृतसर येथील कारागृहातुन ताब्यात घेण्याची प्रक्रिया दिवस भर होऊन सत्यवान भोंग यांना ताब्यात घेणार, मंगळवारी२फेब्रुवारी रात्री रेल्वे ने परत प्रवास , गुरुवारी ४जानेवारी रोजी कुर्डूवाडी येणार व कागदपत्र प्रक्रिया करुन नातेवाईक व कुटुंबांच्या ताब्यात देणार. अशी माहिती पथक प्रमुख स.पो.नी.हनुमंत वाघमारे यांनी दैनिक सकाळ शी बोलताना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.