पंढरपूर तालुक्‍यात आज पाच जण पॉझिटिव्ह आढळले; एकूण रूग्ण सहा 

In Pandharpur taluka five people tested positive today and a total of six patients
In Pandharpur taluka five people tested positive today and a total of six patients
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : मुंबई येथून तालुक्‍यातील उपरी येथे आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज पुन्हा पंढरपूर शहरात दोन, गोपाळपूर, उपरी व करकंब येथे आलेले प्रत्येकी एक अशा पाच जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या पाच पैकी चार व्यक्ती मुंबई तर करकंब येथील व्यक्ती पुणे येथून आलेली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आज सायंकाळी दिली. 
पंढरपूर शहर आणि तालुका एवढे दिवस कोरोनामुक्त होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशानुसार कडेकोट अंमलबजावणी आणि उपाययोजना केल्या होत्या. अपवाद वगळता नागरिकांनी आदेशाचे पालन केले होते. त्यामुळे जिल्ह्यात काही भागांत कोरोना रुग्ण आढळले होते. परंतु, पंढरपूर शहर व तालुका मात्र कोरोनामुक्त होता. 
दरम्यान, अन्य जिल्हा आणि राज्यातून पंढरपूर शहर आणि तालुक्‍यात शासनाची परवानगी घेऊन नागरिक परत येत आहेत. सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक नागरिक आतापर्यंत पंढरपूर शहर व तालुक्‍यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथून तालुक्‍यातील उपरी येथे आलेल्या एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य काही व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. 
या सर्व नागरिकांचा रिपोर्ट काय येतो याकडे पंढरपूर शहर आणि तालुक्‍याचे लक्ष होते. मुंबई येथून पंढरपूर, गोपाळपूर आणि उपरी येथे तर पुणे येथून करकंब येथे आलेल्या एकूण तीन व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या तीन नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग झाल्यानंतर कोणत्या भागात तातडीने आवश्‍यक उपाययोजना करावयाच्या हे ठरविले जाणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आज सायंकाळी येथे पत्रकारांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Solapur Political News
Milk Rate
Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Marathi News Esakal
www.esakal.com