सुट्टीत लेक माहेरी न आल्याची आईबाबांना वाटते खंत

corona.jpg
corona.jpg
Updated on
बार्शी (सोलापूर) : उन्हाळ्याची सुटी म्हटले की सासरी गेलेल्या मुलींना माहेरी येण्यासाठी एक महिन्याची पर्वणीच असते. पण यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शासनाने देशासह राज्यात लॉकडाउन केल्यामुळे आई-वडिलांच्या मनात खंत वाटत आहे ती म्हणजे यंदा माहेरवाशीण आलीच नाही याची.

हेही वाचा : भारीच... तरूणांनी क्वारंटाइन काळात रंगवली शाळा

दरवर्षी साधारण शाळांचे परीक्षेचे निकाल 1 मे रोजी लागतात अन्‌ 15 जूननंतर शाळा सुरू होत असते. या कालावधीत मुलांना सुटी असल्याने अनेक सासूरवाशीण मुली माहेरी येतात.आई-वडिलांसह भाऊ, बहीण, वहिनी यांच्यासोबत एकत्र राहण्याचा आनंद या महिनाभरात अनेक कुटुंबांना उपभोगण्यास मिळतो. या सर्व घटनांवर सध्या केवळ आठवणी जागृत होताना दिसत आहेत. सासरी किती जरी काम असले तरी आईसोबत कुरड्या, पापड्या, शेवया, पापड, सांडगे अशी उन्हाळी कामे करून स्वतःसाठी घेऊन जाण्याचा आनंद माहेरी आलेल्या मुलीला वेगळाच असतो. सासरच्या घराप्रमाणे कितीही केले तरी माहेरचे आजही हे माझे स्वतःचे घर आहे असे समजून घराची पूर्ण स्वच्छता करीत असलेली बहीण किंवा मुलगी हिच्याकडे पाहून आई-वडील व भाऊ यांना वेगळेपण दाखवून देत असते.

हेही वाचा : पाकणी बंधाऱ्यातून कोर्सेगावातून सीना नदीत सोडले पाणी

एकत्र गप्पा, जुन्या आठवणी यांना मिळणारा उजाळा यावर्षी कोरोना संकटामुळे मिळालाच नाही याची खंत अनेक माहेरवाशीण मुलींनी बोलून दाखवली. घरात पाण्याचा ठणठणाट झाल्यावर व सर्वप्रथम पाण्याची घागर घेऊन जाणारी बहीण, प्रत्येक कामात मदत करणारी मुलगी आज आठवते. घरची लेक सुटीला येऊ शकली नाही याची खंत वाटत असल्याचे आज आई-वडील व भावांना वाटत आहे.
मुलांसोबत एकत्र कुटुंबात राहण्याचा योग यावर्षी लॉकडाऊनने हिरावून घेतला आहे. गावची जत्रा, यात्रा, पर्यटन, गुढीपाडवा, अक्षयतृतीया, रमजान असे सण लॉकडाउनमुळे घरात बसून साजरे करण्याची वेळ यावर्षी सर्वांवर आली. आजाराच्या काळात प्रत्येकाने काळजीपूर्वक राहावे, प्रदूषण होणार नाही, सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच कामे करावीत याची दक्षता घ्यावी असा संदेशही मुली आई-वडील, भावांना देत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com