देशभरातील प्रवासी रेल्वे सेवा 17 मे पर्यंत रद्द

देशभरातील प्रवासी रेल्वे सेवा 17 मे पर्यंत रद्द

सोलापूर - कोविड 19 च्या उपाय योजनांच्या अनुषंगाने देशभरातील प्रवासी रेल्वे सेवा 17 मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक सोलापूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील वाणिज्य शाखेने प्रसिद्ध केले आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरातील लॉक डाऊन दोन आठवड्यांनी (4 मे 2020 ते 17 मे 2020 पर्यंत) वाढविण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने असा निर्णय घेण्यात आला आहे की भारतीय रेल्वेवरील सर्व प्रवासी रेल्वे सेवा दिनांक 17 मे 2020 पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

या कालावधीत सर्व मेल / एक्स्प्रेस (प्रीमियम गाड्यांसह)  ),  प्रवासी गाड्या,  मेट्रो रेल्वे, कोलकाता च्या उपनगरी गाड्या  17-मे -2020 पर्यंत रद्द करण्यात आले आहेत. लॉक डाऊन मुळे देशात विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना हलविण्यासाठी "श्रमिक विशेष" गाड्यां सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  जे राज्य सरकारच्या आवश्यकतेनुसार असेल, ते  गृहराज्य मंत्रालयाच्या  मार्गदर्शक सूचनांनुसार असतील. मालगाड्या आणि पार्सल विशेष गाड्या   चालू राहतील.   
 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com