आरोग्य यंत्रणेचा कहरच! रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाला नेले भर उन्हात ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीत

Patient was brought to the hospital by tractor in Karmala taluka
Patient was brought to the hospital by tractor in Karmala taluka
Updated on

सोलापूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था किती कुचकामी आहे, याचे वास्तव चित्र आज करमाळा तालुक्‍यात घडले. रुग्णवाहिका व खासगी वाहनही न मिळाल्यामुळे एका गावातून रुग्णाला ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीत बसवून रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णाला नेण्यासाठी खासगी वाहन मिळावे, म्हणून प्रयत्न करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या भीतीने कोणीही तयार होईना म्हणून सेवा मिळावी यासाठी ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीत नेण्याची वेळ आली. रुग्णाला चक्क ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीत घेऊन घेल्याचे पाहून ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 
करमाळा-जामखेड रस्त्यावरील एका गावात रविवारी (ता. 17) मुंबई येथून परवानगी काढून पती-पत्नी एका वस्तीवर आले होते. दरम्यान, शनिवारपासून ते आजारी पडले. रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला. आजारी असलेल्या व्यक्तीच्या पुतण्याने रुग्णवाहिका मिळावी म्हणून फोन केला. मात्र, तेथून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामस्तरावरील समितीलाही त्यांनी तत्काळ त्याची माहिती दिली. त्यानंतर रविवारी (ता. 24) सकाळी ग्रामस्तरावरील समितीचे सदस्य, आरोग्य अधिकारी, मंडलाधिकारी यांनी तत्काळ भेट दिली. 
आजारी असलेल्या व्यक्तीची वस्ती गावापासून दोन किलोमीटरवर आहे. ते तेथे आल्यापासून स्वतंत्र खोलीतच राहत आहेत. त्यांच्या संपर्कात कोणीही आलेले नाही, असे त्यांच्या पुतण्याने सांगितले. मुंबईतून येताना त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परवाना काढला होता. येथे आल्यानंतर त्यांना ग्रामस्तरावरून तपासणी करण्यासाठी जाण्याचा सल्ला दिला होता. तपासणीसाठी गावापासून 40 किलोमीटरवर वरकुटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते. एवढ्या लांब जाण्यासाठी गाडी मिळाली नाही. शनिवारी ते आजारी पडले होते. तेव्हापासून रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. माझ्या वडिलांचाही काही दिवसांपूर्वी अपघात झालेला आहे. त्यामुळे मला त्यांना सोडून कोठेही जात येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. संबंधित रुग्णाचे वय 55 च्या दरम्यान आहे. ट्रॅक्‍टरमध्ये नेताना ते ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीत बसले. पती मागच्या बाजूला बसले होते. तर पत्नी पुढच्या बाजूला बसली होती. 
 
नातेवाइकांच्या सहमतीनेच 
करमाळ्याचे तहसीलदार समीर माने म्हणाले, आजारी पडलेल्या व्यक्तीची माहिती मिळाल्याबरोबर यंत्रणेने दक्षता घेतली आहे. रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेला कॉल केला होता. मात्र, रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे नातेवाइकांच्या सहमतीने संबंधित रुग्णाला रुग्णालयात ट्रॅक्‍टरने आणले आहे. त्यांना उपचारासाठी दाखल केले आसून आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com