अक्कलकोट तालुक्‍यात दुपारी बारापर्यंत शिक्षक 32.78 तर पदवीधरसाठी 29.15 टक्के मतदान 

राजशेखर चौधरी 
Tuesday, 1 December 2020

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानात आज दुपारी बारा वाजेपर्यंत अक्कलकोट तालुक्‍यातील सुमारे 2327 पदवीधर पैकी 632 (29.15 टक्के) मतदान झाले तर शिक्षकसाठी 903 जणांपैकी 296 जण मत नोंदविले असून त्याची टक्केवारी 32.78 टक्के एवढी आहे. 

अक्कलकोट (सोलापूर) : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या मतदानात आज दुपारी बारा वाजेपर्यंत अक्कलकोट तालुक्‍यातील सुमारे 2327 पदवीधर पैकी 632 (29.15 टक्के) मतदान झाले तर शिक्षकसाठी 903 जणांपैकी 296 जण मत नोंदविले असून त्याची टक्केवारी 32.78 टक्के एवढी आहे. 

आज सकाळी आठ वाजल्यापासून सर्वत्र मतदान उत्साहात सुरू झाले असून हळूहळू दुपारी बारापर्यंत मध्यम गतीने तर त्यानंतर वेगाने मतदान होत असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्येक संघटना व पक्षाचे कार्यकर्ते व नेते यांनी मिळून जास्तीत जास्त मतदान कसे होईल यादृष्टीने प्रयत्न करताना दिसून आले. केंद्रावर योग्य नियोजनाने शांततेत मतदान होत आहे. 

शिक्षक व पदवीधरसाठी एकूण अक्कलकोट तालुक्‍यातील केंद्रांची नावे, एकूण मतदार, झालेले मतदान व त्याची दुपारी बारा वाजेपर्यंत झालेली टक्केवारी ही पुढीलप्रमाणे आहे. याप्रमाणे कल राहिला तर शिक्षक मतदार संख्या ही मर्यादित असल्याने त्याची टक्केवारी जास्त असणार आहे. सायंकाळी पाच वाजता एकूण मतदानाची आकडेवारी स्पष्ट होणार आहे. 

शिक्षक मतदारसंघ गोषवारा 
एकूण मतदार, कंसात झालेले मतदान व टक्केवारी 
अक्कलकोट : 313 (113), 36.10 टक्के, चपळगाव : 126 (36), 28.57 टक्के, दुधनी : 86 (26), 30.23 टक्के, जेऊर : 95 (46), 48.42 टक्के, मैंदर्गी : 85 (24), 28.84 टक्के, तडवळ 130 (22) 16.92 टक्के, वागदरी 68 (29), 42.96 टक्के असे एकूण तालुक्‍यातील 903 पैकी 296 जण मतदान केले असून, त्याची एकूण टक्केवारी 32.78 टक्के एवढी आहे. 

पदवीधर मतदारसंघ गोषवारा 
एकूण मतदार, कंसात झालेले मतदान व टक्केवारी 

अक्कलकोट : 994 (267), 27.70 टक्के, चपळगाव : 211 (49), 46.67 टक्के, दुधनी : 105 (49), 46.67 टक्के, जेऊर : 269 (73), 27.14 टक्के, मैंदर्गी : 286 (82), 28.67 टक्के, तडवळ : 254 (59) 23.73 टक्के, वागदरी : 208 (53), 25.48 टक्के असे एकूण तालुक्‍यातील 2327 पैकी 632 जणांनी मतदान केले असून त्याची एकूण टक्केवारी 29.15 टक्के एवढी आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peaceful voting is going on in Akkalkot taluka