"झेडपी'तील शिपाई 20-25 जणांच्या संपर्कात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

सोलापूर ः सोलापूर महापालिकेतील काही अधिकारी जिल्हा परिषदेमध्ये आले होते. त्या अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तो जिल्हा परिषदेतील अनेकांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील शिपायालाही कोरोनाची लागण झाली. तो शिपाई आरोग्य विभागातील जवळपास 20-25 जणांच्या ंसपर्कात आल्याने खळबळ उडाली आहे. 

कोरोनाच्या धास्तीने जग घाबरुन गेले आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना मोठ्याने पसरु लागला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यात यंत्रणा अपयशी ठरु लागल्या आहेत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग त्यामध्ये आपले सर्वस्व पणाला लावून काम करताना दिसत आहे. महापालिकेतील काही अधिकारी बैठकीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आले आणि जिल्हा परिषदेच्या टेन्शनमध्ये वाढ करुन गेल्याचे चित्र सध्या अनुभवाला मिळत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी हे या महिन्याच्या शेवटी सेवानिवृत्त होत आहेत. पण, त्यांना शासनाने दोन वर्ष वाढीव दिल्याने त्यांना आणखी दोन वर्ष काम करावे लागणार आहे. पण, कोरोना आटोक्‍यात येत नसल्याने त्यांनीही हात टेकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता आरोग्य विभागातील शिपायालाच कोरोना झाल्याने टेन्शन आणखी वाढले आहे. या शिपायाच्या संपर्कात कोण-कोण आले त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील काही जणांचे स्वॅब घेतले आहेत. काहीजणांचे स्वॅब येत्या सोमवारी घेतले जाणार आहेत. पण, त्या शिपायाने जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या प्रत्येकाच्या ऱ्हदयाची धडकन वाढविली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Peon in ZP is contact with 20-25 people