शहरात आता 70 मिटर उंच इमारती बांधकामास परवानगी ! परवानगीसाठी 'हे' आहेत नियम

3Highest_20buildings1.jpg
3Highest_20buildings1.jpg

सोलापूर : राज्य सरकारने केलेल्या नवीन बांधकाम कायद्यानुसार सोलापूर शहरात 70 मिटरपर्यंत इमारतींना परवानगी दिली जाणार आहे. आता 35 मिटरपर्यंतच परवानगी दिली जात आहे. परंतु, 70 मिटरपर्यंत बांधकाम करताना त्या इमारतीच्या चौहूबाजूस 12 मिटरची मोकळी जागा (साईड मार्जिन) असणे आवश्‍यक आहे. मात्र, अशा उंच इमारती गावठाण (जुन्या शहरात) होणे अशक्‍य असून हद्दवाढ भागात 70 मिटर उंचीच्या इमारती होऊ शकतात, अशी माहिती नगरविकास विभागाचे सहसंचालक लक्ष्मण चलवादी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

महापालिकेच्या प्रसुती गृहांमध्ये नवजात बालके असुरक्षित
शहरात महापालिकेच्या आठ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्रसुतीगृहे आहेत. त्यामध्ये डफरीन हॉस्पिटल, साबळे, बॉईज, भावनाऋषी, रामवाडी, चाकोते, दाराशा आणि जिजामाता या नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या नागरी आरोग्य केंद्रांअंतर्गत नऊ हजार 135 गर्भवती महिलांची नोंदणी झाली असून त्यातील एक हजार 136 महिलांची प्रसुती झाली आहे. दरम्यान, भंडाऱ्यातील आगीच्या प्रकरणानंतर अग्निशामक विभागाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला सोबत घेऊन या रुग्णालयांची पाहणी केली. दोन दिवसांपूर्वी फायर ऑडीट पूर्ण करण्यात आले असून त्यात गंभीर त्रुटी काढण्यात आल्या आहेत. डफरीन हॉस्पिटल वगळता अन्य ठिकाणी अग्नी विमोचक यंत्रच नाही. दुसरीकडे रुग्णालयातील इलेक्‍ट्रिक वायरिंग उघड्यावर असून त्यात तत्काळ दुरुस्ती करावी, असे पत्र अग्निशामक विभागाने महापालिकेस दिले आहे. 

मुंबई, पुणे यासह अन्य शहरांप्रमाणेच आता सोलापूर शहरातही गगनचुंबी इमारतींना परवानगी मिळणार आहे. नवीन बांधकाम कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी बांधकाम विभाग व नगररचना विभागाकडून मार्गदर्शन मागविले आहे. या इमारतींना परवानगी देताना बाजूची मोकळी जागा (इमारतीची उंची/पाच) आणि अद्ययावत फायर सिस्टीम आहे की नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. शहरातील नवी पेठ, बाळीवेस, सोमवार, शनिवार पेठ यासह शहरातील मध्यवर्ती भागात म्हणजेच गावठाण परिसरात घरांची दाटीवाटी असल्याने, त्याठिकाणी अशा इमारतींना परवागनी दिली जाणार नाही. जुळे सोलापूर तथा हद्दवाढ भागात अशा उंच इमारतींना परवानगी दिली जाईल, असेही नगररचना विभागाने स्पष्ट केले आहे.

फायर सिस्टिम असावी अद्ययावत
शहरात सध्या 35 मिटरपर्यंतच बांधकामास परवानगी दिली जाते. शहरात तेवढ्या उंचीच्या 300 ते 350 इमारतींना बांधकाम परवाना विभाग आणि अग्निशामक विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. 15 मिटरवरील इमारतींमध्ये अद्ययावत फायर सिस्टीम असणे बंधनकारक आहे. जेणेकरुन आगामी काळात काही कारणास्तव आग लागल्यास त्या सिस्टीमचा वापर करुन आग विझविणे अग्निशामक विभागाला शक्‍य होते, असे अग्निशामक विभागाचे अधीक्षक केदार आवटे यांनी सांगितले. दरम्यान, इमारतधारकांनी आणि ज्याठिकाणी अग्नी विमोचक यंत्रे आहेत, त्यांनी वर्षातून किमान एकदा त्या यंत्राची देखभाल- दुरुस्ती करणे बंधनकारक असून संबंधित कर्मचारी तथा व्यक्‍तींना त्याचा वापर करण्यासंबंधीचे प्रशिक्षण द्यायला हवे, असेही आवटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com