बाजारपेठा व सर्व दुकाने खुली केली आहेत. चित्रपटगृह, नाट्यगृह, जिम सर्व सुरु झाले आहे. तर मग कोरोनाची दुसरी लाट कुठे आहे.? असा सवाल वारकरी संघटनेकडून करण्यात आला. कोणतेच क्षेत्र खुले करण्याचे राहिले नाही. रुग्ण संख्या ही कमी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या आळंदी (कार्तिक) वारीमध्ये पारंपरिक वारकरी व भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
दक्षिण सोलापूर : वारकरी परंपरेमध्ये श्री क्षेत्र आळंदीवारी नित्य नेमाला खूप मोठे महत्व असून तो नेम निष्ठेने सांभाळला गेला आहे. त्यामुळे कार्तिक वद्य त्रयोदशीला होणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली समाधी सोहळा उत्सवाच्या वारीसाठी नियम व अटीसह परवानगी द्यावी अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाने केली आहे.
या मागणीचे निवेदन ईमेलद्वारे मंडळाचे अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे. वारकरी भाविकांनी चैत्रवारी, रामनवमी, संत तुकारम बीज, पैठण येथील एकनाथ महाराजांचा उत्सव, हनुमान जयंती,आषाढीवारी, श्रावण मास, अधिकमास,गणेशोत्सव, नवरात्र, कार्तिकी वारी (पंढरपूर ) हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून घरीच थांबून साजरे केले आहेत. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले आहे. परंतु शासनाने वारकरी परंपरेला योग्य न्याय दिला नाही. सध्या कोरोनाची दुसरी लाट सांगितली जात आहे. तर काळजी म्हणून सर्व व्यवहार व गर्दीबाबत नियोजन दिसत नाही. फक्त वारकरी उत्सव बंद ठेवणे, त्यावर निर्बंध घालणे एवढे प्रयत्न चालू आहेत.
बाजारपेठा व सर्व दुकाने खुली केली आहेत. चित्रपटगृह, नाट्यगृह, जिम सर्व सुरु झाले आहे. तर मग कोरोनाची दुसरी लाट कुठे आहे.? असा सवाल वारकरी संघटनेकडून करण्यात आला. कोणतेच क्षेत्र खुले करण्याचे राहिले नाही. रुग्ण संख्या ही कमी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या आळंदी (कार्तिक) वारीमध्ये पारंपरिक वारकरी व भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
संपादन : अरविंद मोटे