शहरातील खासगी कोचिंग क्‍लासेस सुरु करण्यास परवानगी ! कंटेन्मेंट झोनमधील क्‍लासेस राहणार बंदच

तात्या लांडगे
Wednesday, 20 January 2021

आदेशातील ठळक मुद्दे... 

 • कोचिंग क्‍लासेसमधील कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करावीच लागणार 
 • सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्सिंचा वापर करणे खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांना बंधनकारक 
 • नववीपासून पुढील वर्गाचे कोचिंग क्‍लासेस सुरु करण्यास असेल परवानगी; प्रतिबंधित क्षेत्राबद्दल निर्णय नाहीच 
 • प्रशिक्षण हॉलमध्ये सॅनिटायझर मशीन ठेवावी; थर्मल गनद्वारे तपासावे विद्यार्थ्यांचे टेंप्रेचर 
 • दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचा सोशल डिस्टन्स असावा 

सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे 23 मार्चपासून शहरातील खासगी कोचिंग क्‍लासेस बंद आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी मुलांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी कोचिंग क्‍लासेस सुरु करण्यास परवानगी दिली आहे. हा आदेश 12 जानेवारीला काढला, परंतु तो 21 जानेवारीला प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील सर्व कोचिंग क्‍लासेस सुरु होणार असून त्याठिकाणी कार्यरत कर्मचारी व प्रशिक्षकांनी कोरोना टेस्ट करुन घेणे बंधनकारक आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील कोचिंग क्‍लासेस बंदच राहणार असल्याचे आयुक्‍तांनी आदेशात नमूद केले आहे.

आदेशातील ठळक मुद्दे... 

 • कोचिंग क्‍लासेसमधील कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट करावीच लागणार 
 • सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्सिंचा वापर करणे खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांना बंधनकारक 
 • नववीपासून पुढील वर्गाचे कोचिंग क्‍लासेस सुरु करण्यास असेल परवानगी; प्रतिबंधित क्षेत्राबद्दल निर्णय नाहीच 
 • प्रशिक्षण हॉलमध्ये सॅनिटायझर मशीन ठेवावी; थर्मल गनद्वारे तपासावे विद्यार्थ्यांचे टेंप्रेचर 
 • दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचा सोशल डिस्टन्स असावा 

महापालिकेच्या प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्वच प्रशिक्षण संस्था (लाईट हाऊस, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, टायपिंग व संगणक प्रशिक्षण संस्था) यांना क्‍लासेस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याठिकाणी सॅनिटायझेशन करून घ्यावे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, प्रत्येकांकडे मास्क असायलाच हवा, असेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नववीच्या वर्गावरील सर्व कोचिंग क्‍लासेस सुरु करावेत, असेही आयुक्‍त म्हणाले. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अत्यावश्‍यक आहे. दरम्यान, या सर्व प्रशिक्षण संस्थांनी त्याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे नियमित तपासणी करावी आणि सर्वांकडे मास्क असावा, सर्व संस्थांमधील प्रशिक्षक, व्यवस्थापनातील कर्मचारी, यांनी आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी, असेही आयुक्‍तांनी आदेश दिले आहेत.

  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Permission to start private coaching classes in the city! Classes in the containment zone will be no Permission