होम क्वारंटाईनमधील व्यक्ती  बनावट पास तयार करून आली पंढरपुरात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि जिल्हा बंदी करण्यात आली आहे. बंदी आदेश झुगारून आणि अत्यावश्‍यक सेवेचे बनावट पास तयार करून इस्कॉन संस्थेचे चार साधक आज दुपारी पुणे जिल्ह्यातून शेगाव दुमाला येथील इस्कॉन मंदिरात आले आहेत.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने राज्य आणि जिल्हा बंदी केलेली असताना अत्यावश्‍यक सेवेचे बनावट पास तयार करून पुणे जिल्ह्यातील थेऊर येथून होम क्वारंटाईनचे हातावर शिक्के असलेले इस्कॉन संस्थेचे चार साधक मंगळवारी (ता. 14) पंढरपुरात दाखल झाले आहेत. यामध्ये एका अमेरिकन साधकाचाही समावेश आहे. याबाबत शेगावदुमाला येथील ग्रामस्थांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. 
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि जिल्हा बंदी करण्यात आली आहे. बंदी आदेश झुगारून आणि अत्यावश्‍यक सेवेचे बनावट पास तयार करून इस्कॉन संस्थेचे चार साधक आज दुपारी पुणे जिल्ह्यातून शेगाव दुमाला येथील इस्कॉन मंदिरात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये एका अमेरिकन साधकाचा समावेश असून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के देखील मारण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातून इस्कॉन मंदिरात साधक आल्याची माहिती येथील ग्रामस्थांना मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. चारही साधक होम क्वारंटाईन मधून पळून आल्याची शक्‍यता येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या चारही साधकांना तत्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे, या मागणीसाठी येथील ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत इस्कॉन मंदिरात ठाण मांडून बसले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस चौकशी करत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A person who came to Pandharpur by making a fake pass for emergency service