शेतकऱ्यांचे शोषण थांबवा ! प्रादेशिक सहसंचालकांचा सहकारी, खासगी साखर कारखान्यांना आदेश

The picture of cane harvesting laborers obstructing farmers can be seen everywhere
The picture of cane harvesting laborers obstructing farmers can be seen everywhere

लवंग (सोलापूर) : ऊस वाहतूकदार आणि ऊस तोडणी मजुरांकडून शेतकऱ्यांचे होत असलेले शोषण साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने थांबवावे, असे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांना पाठवल्याने ऊस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
यंदा ऊसाचे क्षेत्र मुबलक आहे. याचा फायदा घेत ऊस तोडणी मजूर हे शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. साखर कारखानदार या गोष्टीकडे डोळेझाक करत असल्याचा फायदा वाहतूकदार व ऊसतोडणीदार घेत आहेत. कारखान्याने ऊस तोडणीची चिट्ठी दिल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांकडून घसघशीत रक्कम घेतल्याशिवाय ऊस तोडणीला सुरुवात केली जात नाही. ऊस तोडणी अर्ध्यावर आल्यानंतर ऊस मालकाकडून मांसाहाराचे जेवण मागायचे, अन्यथा ऊस तोडणी अर्ध्यावर सोडून जाण्याची धमकी देतात. शेतकऱ्यांच्या शेतात फळबागा भाजीपाला असतील तर ते न विचारता तोडून घेऊन जातात. 

शेतकऱ्यांच्या हिश्‍याचे उसाचे वाडे शेतकऱ्यांना न देता त्याची विक्री करून पैसे कमावले जातात. त्याचप्रमाणे ऊस वाहतूक वाहनधारकही वाहनाच्या प्रत्येक खेपेस शेतकऱ्यांकडून ठराविक रक्कम वसूल करतात. संबंध नसताना चालकाला दोन्ही वेळच्या जेवणाचा डबा पोहोच करायला सांगतात. याबाबत कारखान्याचे चीट बॉय आणि शेतकी अधिकारी यांच्याकडे शेतकरी तक्रारी करतात. परंतु तेही लक्ष देत नाही. काही ठिकाणी चीटबॉयही ऊसाला तोड द्यायची झाली, तर शेतकऱ्याकडून जेवणाची पार्टी आणि रोख रक्कम घेतल्याशिवाय लवकर तोड देत नाहीत. 

साखर कारखानदारांना हे माहीत असतानाही ते मूग गिळून गप्प का बसतात, असा शेतकरी नेहमी प्रश्न करत असतात. आता साखर सहसंचालकांनी यात लक्ष घालून आदेश दिल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत असून, याची अंमलबजावणी होते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

ऊस तोडणी मजुरांकडून शेतकऱ्यांचे होणाऱ्या शोषणास साखर कारखान्यांनी लक्ष देऊन पायबंद घातला पाहिजे. त्यांचीच ही जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना कोणी जर पैसे मागितले, तर त्यांनी आमच्या कार्यालयात तक्रार करावी. 
-राजेंद्र दराडे, प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com