esakal | आसबेवाडीत दोन एकर देशी वृक्षांची लागवड 
sakal

बोलून बातमी शोधा

Salgar Budruk.jpg

इंटरनॅशनल लायन्स क्‍लब 3234 डी - 2 चा यावर्षीचा मुख्य कार्यक्रम "देवराई अर्थात वृक्ष लागवड' या अंतर्गत आसबेवाडीत 2 एकर क्षेत्रावर आंबा, वड, पिंपळ, पळस, चिंच, कवठ, औदुंबर, शिसम, फणस, बेहडा, बिबा, अर्जून, बेल, नांद्रुक, टेंभूर्णी, फणस, शेवगा, धावडा, मोहगणी, मोही, आवळा या प्रकारची 1500 झाडे लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

आसबेवाडीत दोन एकर देशी वृक्षांची लागवड 

sakal_logo
By
महेश पाटील

सलगर बुद्रुक : आसबेवाडी ता. मंगळवेढा येथे इंटरनॅशनल लायन्स क्‍लबच्या आसबेवाडी देवराई ग्रुपच्या प्रकल्पाचे नुकतेच उद्‌घाटन करण्यात आले. निसर्गातून मानवाच्या अतिक्रमणामुळे प्रदुषणवाढ, पक्षांचा चारा व जंगल (वन) संपत्तीचा ऱ्हास होत चालला आहे. आसबेवाडी येथील पुणेस्थित उद्योजक दामाजी आसबे यांच्या पुढाकाराने दोन एकर क्षेत्रावर सुमारे 115 प्रकारच्या विविध देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. 

इंटरनॅशनल लायन्स क्‍लब 3234 डी - 2 चा यावर्षीचा मुख्य कार्यक्रम "देवराई अर्थात वृक्ष लागवड' या अंतर्गत आसबेवाडीत 2 एकर क्षेत्रावर आंबा, वड, पिंपळ, पळस, चिंच, कवठ, औदुंबर, शिसम, फणस, बेहडा, बिबा, अर्जून, बेल, नांद्रुक, टेंभूर्णी, फणस, शेवगा, धावडा, मोहगणी, मोही, आवळा या प्रकारची 1500 झाडे लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. लायन्स क्‍लब 3234 डी -2 पुणे विभागाचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांच्या उपस्थितीत लायन्स क्‍लब 3234 डी - 1 कोल्हापूर विभागाचे प्रांतपाल लायन आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते आणि पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी क्‍लबचे अध्यक्ष लायन प्रा. अमृतराव काळोखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. 

प्रांतपाल शास्त्री यांनी ग्रामीण भागातील लोक विशेषतः शेतकरी बांधवांनी आपले योगदान देवून वृक्ष लागवडीवर भर देवून प्रदूषण कमी करणे, वृक्षांच्या छायेतून पशु - पक्ष्यांचा अधिवास वाढवणे यासह जमिनीची धूप कमी करून भु-गर्भातील पाण्याचा साठा वाढवावा असे आवाहन केले. प्रांतपाल देशपांडे यांनी दामाजी आसबे यांच्या दातृत्वाचे अभिनंदन करुन गावकऱ्यांच्या एकजूटीचे कौतुक केले. तरुण कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी "देवराईची' जोपासना करुन दोन वर्षानंतर हे स्थळ शाळांची सहल व वृद्धांना विरंगुळ्याचे स्थान बनवून मंगळवेढा तालूक्‍यातील गावांच्यापुढे आदर्श निर्माण करावा असे आवाहन केले. देवराई जोपासण्यासाठी शेततळे, ठीबक सिंचन व शेजारी घन लागवडीबरोबर संपूर्ण वनराईस कम्पाऊंड निर्मिती या गोष्टी निर्माण केल्याबद्धल पिंपरी -चिंचवड स्मार्ट सिटी क्‍लब व गावकऱ्यांचे विशेष आभार मानले. 

इंटरनॅशनल लायन्स क्‍लब च्या "देवराई' प्रकल्पाचे प्रणेते लायन ढोले यांनी प्रत्येक वृक्षाचे महत्त्व विशद केले. देवराईमुळे जमिनीतील जलसाठा, पक्ष्यांना खाद्य व रहिवास, परिसरातील स्वच्छ हवा राहून माणसाचे आरोग्य कसे निरोगी राहते हे उदाहरणासह पटवून दिले. 
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना लायन अमृतराव काळोखे यांनी जलयूक्त शिवार योजना व पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेत एकजुटीच्या माध्यमातून आसबेवाडी गावाने राज्यात जसा डंका फडकवला तसाच सर्वच्या सर्व झाडे जगवून, त्यांची योग्य निगा राखून देवराई पॅटर्नचा राज्यासमोर आदर्श ठेवावा असे आवाहन केले. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या युवकांच्या गावच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांना योग्य साथ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

कार्यक्रमास प्रथम लेडी लायन अनुराधा शास्त्री, वन विभागाचे विलास शिंदे, सिंधु रिजनचे झोन चेअरमन लायन के.डी. कुलकर्णी, लायन गिरीश गणात्रा, कोल्हापूर प्रांताचे उपप्रांतपाल लायन यांच्यासह गडहिंग्लज लायन्स क्‍लबचे उपाध्यक्ष लायन सभासद यांच्यासह पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी क्‍लबच्या माजी अध्यक्षा नंदिनी आसबे, सदस्य लायन समाधान आसबे, दामाजी शिंदे, सिद्धू आसबे, सुधीर शिंदे, नितीन आसबे हे लायन सदस्य उपस्थित होते. 

देवराईसारखा महत्त्वाचा कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल क्‍लबचे अध्यक्ष लायन प्रा. अमृतराव काळोखे व देवराईचे प्रायोजक दामाजी आसबे यांचा इंटरनॅशनल लायन्स क्‍लब यांच्या वतीने प्रमाणपत्र देवून प्रांतपाल लायन आर. व्ही. देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
आसबेवाडी ग्रामस्थांना प्रत्येकी 5 झाडांचे वाटप प्रांतपाल व वनविभागाचे विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आसबेवाडी गावचे सरपंच सुरेश आसबे, वसंत आसबे, हणमंत मोरे, रतिलाल आसबे, पाणी फाउंडेशन आसबेवाडी समन्वयक दत्ता आसबे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ, शिक्षक, मुंबई पुणेस्थित व्यावसायिक- नोकरदार उपस्थित होते. 

संपादन : अरविंद मोटे