हालहळ्ळी मारहाण प्रकरणातील संशयित आरोपींना कर्नाटकातून अटक 

चेतन जाधव 
Saturday, 29 August 2020

अक्कलकोट तालुक्‍यातील हालहळ्ळी (अ) या गावातील नागनाथ परमेश्वर हुक्केरी यांना संशयित आरोपींनी लोखंडी रॉड, दगड, दांडक्‍याने मारहाण करून जखमी केले होते. उपचाराकरिता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल असताना त्यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. संशयित आरोपी निलप्पा लक्ष्मण बिराजदार, खंडेशा नीलप्पा बिराजदार, भागेश निलप्पा बिराजदार, मल्लिनाथ धुंडप्पा बिराजदार व गुरुनाथ धुंडप्पा बिराजदार (रा. सर्व हालहळ्ळी, तालुका अक्कलकोट) हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. 

अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील हालहळ्ळी (अ) या गावातील नागनाथ परमेश्वर हुक्केरी मारहाण प्रकरणातील माजी सरपंचासह इतर चार संशयित आरोपींना डीबी पथकाने कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील कन्नल या गावात तुरीच्या पिकात लपलेले असताना अटक केली. अक्कलकोट न्यायालयात उभे केले असता संशयित आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. 

पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की तालुक्‍यातील हालहळ्ळी (अ) या गावातील नागनाथ परमेश्वर हुक्केरी यांना संशयित आरोपींनी लोखंडी रॉड, दगड, दांडक्‍याने मारहाण करून जखमी केले होते. उपचाराकरिता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल असताना त्यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. संशयित आरोपी निलप्पा लक्ष्मण बिराजदार, खंडेशा नीलप्पा बिराजदार, भागेश निलप्पा बिराजदार, मल्लिनाथ धुंडप्पा बिराजदार व गुरुनाथ धुंडप्पा बिराजदार (रा. सर्व हालहळ्ळी, तालुका अक्कलकोट) हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांनी या गुन्ह्यातील फरारी आरोपींना अटक करण्याची जबाबदारी डीबी पथकावर सोपविली होती. 

डीबी पथकाने मोठ्या कौशल्याने संशयित आरोपी हे कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील कन्नल या गावातील शेतातील तुरीच्या पिकात लपून बसल्याचे माहिती काढली. पोलिसांनी नियोजन करून रात्रीच्या वेळेस आरोपी पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नाळे, डीबी पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल सिद्राम धायगुडे, पो. ना. महादेव चिंचोळकर, पोलिस कॉन्स्टेबल जगदीश राठोड, प्रमोद शिंपले यांनी पार पाडली. अक्कलकोट न्यायालयात आरोपींना उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नाले हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police have arrested the suspects in the Halhalli assault case from Karnataka