पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात साडेसहा लाखांचा गांजा जप्त ! अक्कलकोट तालुक्‍यातील पानमंगरुळ येथील घटना 

चेतन जाधव 
Monday, 25 January 2021

तालुक्‍यातील पानमंगरुळ येथे सुमारे 6 लाख 51 हजार 810 रुपये किमतीचा सुकवलेला (वाळवलेला) गांजा, 21.781 ग्रॅम व 62 किलो गांजाची झाडे असे एकूण 83.78 किलो गांजा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. दोन संशयित आरोपी फरार असून त्यांच्यावर दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील पानमंगरुळ येथे सुमारे 6 लाख 51 हजार 810 रुपये किमतीचा सुकवलेला (वाळवलेला) गांजा, 21.781 ग्रॅम व 62 किलो गांजाची झाडे असे एकूण 83.78 किलो गांजा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. दोन संशयित आरोपी फरार असून त्यांच्यावर दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड, अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस हेड कॉन्स्टेबल राम पवार, पोलिस हेड कॉन्स्टेबल मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस नाईक वीरभद्र उपासे, पोलिस नाईक संजय पांढरे, पोलिस नाईक लक्ष्मण कांबळे, पोलिस नाईक राजू कोळी, पोलिस कॉन्स्टेबल भाऊ सरवदे, सोनकांबळे, सुरवसे, पोलिस कॉन्स्टेबल सुतार यांनी मिळून मौजे पानमंगरुळ (ता. अक्कलकोट) येथे छापा टाकला. 

या छाप्यात संशयित आरोपी लकप्पा भिमशा पुजारी (वय 60) एका पायाने अपंग, रामचंद्र भिमशा पुजारी (वय 40, दोघेही रा. पानमंगरुळ, ता अक्कलकोट) यांच्या घरात व शेतात शनिवारी (ता. 23) रात्री 6 लाख 51 हजार 810 रुपये किमतीचा सुकवलेला गांजा, 21.781 किलो व शेतातील गांजाची झाडे त्यांचे वजन 62 किलो असे एकूण 83.781 किलो गांजा जप्त करण्यात आला. संशयित दोन्ही आरोपींनी आपल्या शेतात गांजाचे पीक घेऊन ते वाळवून विक्री करण्याच्या इराद्याने त्यांच्या राहत्या घरात बाळगलेल्या अवस्थेत मिळुन आले. दोन्ही संशयित आरोपी फरार असून त्यांच्यावर दक्षिण पोलिस ठाण्यात नारकोटिक्‍स ड्रग्स ऍन्ड सायकोट्राफीक सबस्टन्स ऍक्‍ट 1985 चे कलम 8(क), 20(क), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याची फिर्याद सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड यांनी दिली असून, याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police seized cannabis worth Rs six and half lakh at Panmangarul