दशक्रिया विधी करणाऱ्यांना पोलिसांनी पास द्यावे 

dashkriya vidhi.jpg 1.jpg
dashkriya vidhi.jpg 1.jpg
Updated on

सोलापूर : कोरोना व्हायरस पार्श्‍वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स ठेवून दशक्रिया विधी करत आहेत. मात्र, दशक्रिया विधी करणाऱ्यांची अडवणूक होते. त्यामुळे त्यांना पास द्यावेत, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे. 

सोलापुरातील दत्त चौकातील गणपती घाटावर दशक्रिया विधी केला जातो. हा विधी सध्या सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. दशक्रिया विधीपर्यंतचे सर्व कर्म करावे. त्यानंतर उर्वरित कर्म वातावरण निवळल्यानंतर केले तरी चालेल, असे मत दशक्रिया विधी करणाऱ्यांचे आहे. त्यांना पोलिसांनी पास उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी सध्या होत आहे. दशक्रिया विधी करणाऱ्यांना दुसरे काम मिळत नाहीत, त्यामुळे सध्या परिस्थिती बिकट असल्याचे त्यांनी सांगितले. 


घरातील दिवा 11व्या दिवशी विसर्जित करावा 
मंत्राग्नि झालेला नसेल तर सर्व अस्थि विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधि करून मग नवव्यापर्यंतचे विधि करावेत. त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे. घरातील दिवा 11व्या दिवशी विसर्जित करावा तसेच सूतक 11व्या दिवशी संपते. त्यामुळे अन्य सर्व व्यवहार, घरातील पूजा सूतक संपल्याने करता येईल. 
- मोहन दाते, पंचागकर्ते 

हातावरचे पोट आहे विधी केल्यावरच मिळतात पैसे 
दशक्रिया विधी केल्यावरच आम्हाला पैसे मिळतात. आमचे हे हातावरचे काम आहे. कोरोना व्हायरस पार्श्‍वभूमीवर सध्या दशक्रिया विधी करण्यासाठी आम्ही कमीत कमी माणसांना बोलवून करत आहोत. मात्र, सध्या आमची परिस्थिती बिकटच आहे. 
-जयंत अध्यापक 
 
दशक्रिया विधी करा इतर कर्म सवडीने करा 
दशक्रिया विधी करणे गरजेचे आहे. त्यानंतर सर्व कर्म सवडीने केल्याने पोलिसांनी दशक्रिया विधी करणाऱ्यांना पास द्यावे. आम्ही कमीत कमी माणसांत आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे विधी करत आहोत. 
-अरुण कुलकर्णी 

हेही वाचा : सोलापुरात प्रशासन पॉझिटीव्ह, कोरोना निगेटिव्ह 

दशक्रिया विधी करणाऱ्यांकडे शासानाचे दुर्लक्ष 
दशक्रिया विधी करण्यासाठी सध्या पंतलु मिळत नाहीत तसेच दशक्रिया विधीचे सामान उपलब्ध होत नाही. त्यामुळे दशक्रिया विधी करणाऱ्यांचे हाल होत आहेत. मात्र, शासनाचे त्यांच्याकडे लक्ष नाही. 
-वेणूगोपाल जिल्ला 

गरजेनुसार पास देण्यात येतील 
दशक्रिया विधी करणाऱ्यांना गरजेनुसार पास उपलब्ध करून देण्यात येतील. त्यांनी पोलिस खात्याशी संर्पक साधून पास घ्यावेत. कोणतीही अडचण येणार नाही. 
अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com