बर्ड फ्लूमुळे कुक्कुटपालक चिंताग्रस्त ! प्रशासनाने केल्या गणेशवाडी येथील 440 कोंबड्या नष्ट 

Bird_Flu
Bird_Flu
Updated on

मंगळवेढा (सोलापूर) : बर्ड फ्लू आजाराच्या विळख्याने ग्रस्त झालेल्या तालुक्‍यातील गणेशवाडी येथे 440 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने खुराडे निरजंतुकीकरण करून औषध फवारणी करून घेतली आहे. 

पशुसंवर्धन विभागाकडे गणनेनुसार 1427 कोंबड्यांची नोंद होती. परंतु बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव लक्षात घेता नष्ट करताना 440 कोंबड्या आढळून आल्या. सात पथकांद्वारे या कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. दरम्यान, चोखामेळा नगरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने या भागातील कुक्कुट पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

तालुक्‍यामध्ये बर्ड फ्लू आजाराची लागण जंगलगी येथील पोल्ट्री फार्ममध्ये झाल्यानंतर ऍलर्ट झोन जाहीर करत या गावातील 773 कोंबड्या व 110 अंडी नष्ट करण्यात आली. त्यानंतर भालेवाडी व मारापूर येथे देखील या बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या मृत झाल्यानंतर तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली. कोंबडी पालकात चिंतेचे वातावरण पसरले. त्यानंतर प्रशासन सतर्क झाले असताना पुन्हा चोखामेळा नगर येथे देखील कोंबड्या मृत झाल्या. नंतर त्याचा विळखा गणेशवाडीत पसरला. दरम्यान, चोखामेळा नगर येथील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर गणेशवाडी येथील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सात पथकांद्वारे कोंबड्या व अंडी नष्ट करण्यात आली आहेत. तर भालेवाडी व मारापूर येथील कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. 

सध्या अनेक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय निवडला आहे. परंतु कोंबड्यांचा मृत्यू होण्याच्या घटनांमुळे या पशुपालकांत खळबळ उडाली आहे. अनेकांनी कोंबड्या नष्ट करण्यापेक्षा विकलेले बरे म्हणून मिळेल त्या कमी किमतीत आहेत. 

चोखामेळा नगरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर गणेशवाडी येथील अहवाल पॉझिटिव्ह आल्याने 440 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. खुराड्यांची स्वच्छता करून फवारणी करण्यात आली आहे. 
- गोविंद राठोड 
पशुधन अधिकारी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur Police Raid on MD Drugs
Mumbai-Mantralay
A total of 1,667 beneficiaries availed government schemes and services at the Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Samadhan Camp in Mohol, where 17 departments offered citizen-centric services under one roof.
BJP workers staged a road blockade and burnt an effigy of Shiv Sena MP Sanjay Raut in Sangola, protesting his remarks against Minister Jaykumar Gore.
Marathi News Esakal
www.esakal.com