सोलापूर जिल्ह्यातील ‘हे’ गाव आठवड्यापासून अंधारात; रॉकेल नसल्याने लावले जातायेत तेलाचे दिवे

अण्णा काळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

करमाळा तालुक्यातील बिटरगाव (श्री) पाच दिवसापासून आंधारात आहे. येथील गावाला विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्म महिनाभरापासून जळाला होता.

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील बिटरगाव (श्री) पाच दिवसापासून आंधारात आहे. येथील गावाला विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्म महिनाभरापासून जळाला होता. गावाकऱ्यांनी विद्युत मंडळाकडे या संदर्भात वारंवार तक्रार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

ट्रान्सफार्मर जळालेला असताना सुद्धा कमी दाबाने विद्युत पुरवठा होतहोता. परंतु पाच दिवसांपासून तोही विद्युत पुरवठा बंद झाला आहे.
बिटरगाव (श्री) हे करमाळ्यापासून दहा किलोमीटरवर आहे. करमाळा जामखेड रस्त्यावर सिना नदीच्या काटावर हे गाव आहे. महिन्याभरापर्वी येथील गावाला विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर ना दुरुस्त झाला होता. त्यानंतर कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने फ्रीज चालत नव्हते.

घरातील पंखे बंद होते. टीव्ही चालत नव्हते, त्यामुळे अनेकांना घडामोडीही समजत नव्हत्या. पिठाची चिकीही बंद असल्याने शेजारील गावात दळण दळायला जावे लागत होते. त्यामुळे गावातील नागरिकांनी तक्रार केली होती. मात्र, विद्युत मंडळाने याकडे दुर्लक्ष केले. पाच दिवसापूर्वी सायंकाळी येथील ट्रान्सफार्म पूर्ण जळाला आणि तेव्हापासून गाव अंधारात गेले. तेव्हापासून सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे. 

सरकारने नागरिकांना दिले जाणारे रॉकेलही बंद केले आहे. त्यामुळे संध्याकाळी घरात नागरिकांना दिवेही लावता येत नाहीत. अनेकजण रात्री तेलाचे दिवे लावत आहेत. तर काही ठिकाणी अंधारात राहावे लागत आहे. सध्या पावसाळा असल्याने सर्प निघण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

विनोद कुलकर्णी म्हणाले, रेशन दुकानातून रॉकेल मिळत नाही. त्यामुळे घरात दिवा लावायचा कसा, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. मोबाईलला चार्जिग करण्यासाठी गावापासून लांब शेतात जावे लागत आहे. शेतातही सध्या दिवसा लाईट नसते. पिठाची चक्की बंद आहे. बाहेरच्या गावातून दळण आणावे लागत आहे.

सतिश घोडके म्हणाले, कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे शेजारील गावात दळण देखील दळूण दिले जात नाही. पावसाळा असल्याने बाहेर अंधार पडतो. त्यातून धोका होण्याची शक्यता आहे. याकडे त्वरीत लक्ष द्यावे.

बहुजन संघर्ष सेनेचे युवक सचिव प्रविण घोडके म्हणाले, विद्युत मंडळाने त्वरीत ट्रान्सफार्मर बसवावा, अन्यथा रस्त्यावर उतरले जाईल. गाव डिपीच वेळेत येत नसेल तर शेतातील ट्रान्सफार्मचे काय होत असेल? गाव डिपी २४ तासात दुरुस्त करणे आवश्‍यक असताना पाच दिवस गाव अंधारात आहे. महिना भरापासून कमी दाबाने विद्युत पुरवठा होत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power supply cut off in Bittergaon in Karmala taluka