esakal | गर्भसंस्कार-काळाची नव्हे बाळाची गरज : डॉ. सुषमा चौखंडे, वैद्य
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma.jpg

आयुर्वेदाने हे खूप आधीच सांगून ठेवले आहे. परंतु आपले दुर्दैव असे आहे की, पाश्‍चात्त्यांकडून शिक्कामोर्तब झाले की मग आपल्या लक्षात येते. असो, गंमत अशी आहे की गर्भ हा 16 आठवड्यांचा असल्यापासून ऐकू शकतो पण प्रत्यक्षात त्याचा कान हा 24 आठवड्यादरम्यान तयार होतो, त्या गर्भाला 18-20 आठवड्यादरम्यान दृष्टी येते. 28 आठवड्यापर्यंत त्याच्या पापण्या मिटलेल्या असतात.

गर्भसंस्कार-काळाची नव्हे बाळाची गरज : डॉ. सुषमा चौखंडे, वैद्य

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : आजही अनेकांना गर्भसंस्काराचे महत्त्व काहीच वाटत नाही. कारण त्यांना असे वाटते की, सर्व इंद्रियांनी सक्षम अशा धडधाकट मुलांवर आपण संस्कार केले तरी तो सुधारत नाही किंवा त्यात फारसा बदल होत नाही. त्या पोटातल्या गोळ्याला काय सुधारणार? गर्भावर कशाप्रकारे संगीताचा, आहार-विहाराचा, मानवी भावना याचा परिणाम होतो याचे संशोधन सुरू आहे. तसेच यासाठी वेगवेगळे विभाग सुरू केले आहेत.

आयुर्वेदाने हे खूप आधीच सांगून ठेवले आहे. परंतु आपले दुर्दैव असे आहे की, पाश्‍चात्त्यांकडून शिक्कामोर्तब झाले की मग आपल्या लक्षात येते. असो, गंमत अशी आहे की गर्भ हा 16 आठवड्यांचा असल्यापासून ऐकू शकतो पण प्रत्यक्षात त्याचा कान हा 24 आठवड्यादरम्यान तयार होतो, त्या गर्भाला 18-20 आठवड्यादरम्यान दृष्टी येते. 28 आठवड्यापर्यंत त्याच्या पापण्या मिटलेल्या असतात. याचा आयुर्वेदाने खूप सूक्ष्म स्तरावर अभ्यास केला आहे. आयुर्वेद असे सांगते की, संततीप्राप्तीची इच्छा असणाऱ्या दांपत्यांनी बीजसंस्कार करून घ्यावे, कारण "शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी।।' 
जेवढे बीज शुद्ध असेल तेवढेच फळ उत्तम असते. त्यामुळेच यात सर्वप्रथम दांपत्याचे शरीर शुद्ध केले जाते. त्यानंतर सात्त्विक आहार-विहार यांचे कटाक्षाने पालन करावे लागते, गर्भसंस्कारवेळी काही आनुवंशिक आजार असतील तर त्याची कल्पना वैद्यांना द्यावी. जेणेकरून त्यावर उपाययोजना करता येईल. त्यानंतर गर्भधारण जेव्हा होते, तेव्हा गर्भसंस्कार प्रक्रियेला सुरवात होते. 
आयुर्वेदात "गर्भिणी परिचर्या' म्हणजेच गर्भिणीने पाळावयाचे नियम सांगितले आहेत. जे अत्यंत शास्त्रोक्त आहेत. तसेच मासानुमासिक काढे गर्भिणीला दिले जातात. दर महिन्याला गर्भाच्या अंगप्रत्यांगाची ज्याप्रमाणे वाढ होते. त्यानुसार काढे दिले जातात, उदा. सहाव्या महिन्यांत गर्भाची बुद्धी विकसित होते. त्यानुसार काढे देऊन पथ्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे विविध योगासने, प्राणायाम, गर्भसंवाद, विविध संस्कार यांचा समावेश होतो. यासाठी आयुर्वेद तज्ज्ञाकडूनच हे करून घ्यावे. तसेच आणखी महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियावर याचे मार्गदर्शन करणारे खूप व्हिडिओ आहेत, परंतु यात बऱ्यापैकी अर्धवट व चुकीची माहिती असते. त्यामुळे स्वतःची सद्‌सद्विवेकबुद्धीचा वापर करून याचे पालन करावे. तसेच प्रत्येक गर्भिणीची अवस्था, प्रकृती ही वेगवेगळी असते आणि फक्त तज्ज्ञच ठरवू शकतो की पुढे काय करावे. गर्भसंस्कार हे आयुर्वेदाने दिलेले वरदान आहे. त्याचा वापर सुदृढ, निरोगी, सर्वगुणसंपन्न संतती होण्यासाठी खूप मदत होते म्हणून या बदलत्या काळात प्रत्येक गर्भिणीने गर्भसंस्कार करूनच घ्यायला हवे. 
- सुषमा चौखंडे, वैद्य