
तालुक्यात पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी, पुणे विभाग पदवीधर शिक्षक मतदारसंघ माळशिरस विभाग, अकलूज तथा उपविभागीय अधिकारी शमा पवार व तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली.
माळशिरस (सोलापूर) : तालुक्यात पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सहाय्यक पदनिर्देशित अधिकारी, पुणे विभाग पदवीधर शिक्षक मतदारसंघ माळशिरस विभाग, अकलूज तथा उपविभागीय अधिकारी शमा पवार व तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली.
माळशिरस तालुक्यात पदवीधर मतदार संघासाठी एकूण 6 हजार 547 मतदार असून त्यापैकी 5 हजार 111 पुरुष मतदार तर 1 हजार 436 महिला मतदार आहेत. तसेच शिक्षक मतदार संघासाठी 1 हजार 364 मतदार असून 1 हजार 59 पुरुष मतदार तर 305 महिला मतदार आहेत.
पदवीधर मतदारसंघासाठी केंद्रनिहाय मतदारांची संख्या
तालुक्यातील शिक्षक मतदारसंघासाठी मतदान
मतदानासाठी सात मतदान केंद्रांची रचना करण्यात आली आहे. शिक्षक मतदार संघासाठी एकूण 1364 मतदार असून त्यापैकी 1059 पुरुष तर 305 महिला मतदारांची संख्या आहे.
केंद्रनिहाय मतदारांची संख्या याप्रमाणे
दोन्ही मतदार संघांसाठी मतदान 1 डिसेंबर रोजी व मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार असल्याचे शमा पवार व जगदीश निंबाळकर यांनी सांगितले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल