अरेच्या ह्यांनी तर शिक्षकांनाच बनवले मामा

Preparations for the 12th exams started in the college
Preparations for the 12th exams started in the college

सोलापूर : बारावी आणि दहावीची बोर्डाची परिक्षा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये याचीच सध्या तयारी सुरु आहे. विद्यार्थ्यांची पूर्व परिक्षा घेणे, त्यांचे हॉल तिकीट देणे ही कामे महाविद्यालयांमध्ये वेगाने सुरु आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून पूर्व परिक्षेच्या उत्तर पत्रिका पालक आल्याशिवाय दिल्या जात नाहीत. मात्र, यात विद्यार्थी शक्कल लढवत असून शिक्षकांनाच मामा बनवत आहेत. आई- वडील व मामा यांना महाविद्यालयात घेऊन न जाता जवळच्या एखाद्या मोठ्या मित्राला किंवा व्यक्तीला मामा म्हणून शिक्षकांपुढे घेऊन जात आहेत. आणि त्यानंतर उत्तरपत्रिका घेत आहेत. 
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी त्यांना शिस्त लागावी म्हणून महाविद्यालये अनेक वेगवेगळे प्रयत्न करत असतात. यात एकही माहाविद्यालय मागे नसते. सोलापूरात संगमेश्‍वर महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय, बुर्ला महाविद्याल अशी अनेक प्रमुख महाविद्यालये आहेत. याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. पुढच्या महिन्यात १२ वीची १८ तारखेला परिक्षा सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर सध्या महाविद्यालयांमध्ये तयारी सुरु आहे. २६ जानेवारीदिवशी सुट्टी असताना सुद्धा अनेक महाविद्यालयांमध्ये ‘ओपन हाऊस’ ठेवण्यात आले होते. या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका देण्यात येत होत्या. तेव्हा प्राध्यापकांनी पालकांना घेऊन येण्यास सांगितले होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची महाविद्यालमध्ये सकाळपासूनच गर्दी होती. यामध्ये अनेक विद्यार्थींनी हुशारी केली होती. त्यात बाहेरगावच्या अनेक विद्यार्थ्यांनी मामा म्हणून दुसऱ्याच कोणत्या व्यक्तींना आनले होते.
संगमेश्‍वर महाविद्यालयात रविवारी ओपन हाऊस ठेवण्यात आले होते. त्यात काही विद्यार्थ्यांनी मामा म्हणून दुसऱ्याच व्यक्तीला आणले होते. एक व्यक्ती नाव न छापण्याच्या अटीवर ‘मी सकाळपासून एकाच महाविद्यालयात तीन विद्यार्थ्यांचा मामा बनून गेलो होतो,’ असे सांगितले.  तर एका विद्यार्थ्यांनी सांगितले की, मला पालकांना बोलवायला आवडले, पण माझे आई- वडील बाहेरगावी असतात, त्यांना येणे शक्य नाही. त्यामुळे मी दुसऱ्याच मोठ्या व्यक्तीला मामा म्हणून नेले होते.
एक मुलगा म्हणाला, माझ्या आजोबाचे वर्षश्रद्ध असल्यामुळे पालकांना येणे शक्य नाही, त्यामुळे अडचण आली. म्हणून दुसऱ्याच एकाला मामा केले. आणि उत्तरपत्रिका घेऊन आलो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com